शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

ऐकून धक्का बसला ना..! पण, हे खरंय...महिलेने कमी केले तब्बल २१४ किलो वजन ! 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2019 12:54 PM

वयाच्या ६ व्या वर्षापासून अमिता यांचे वजन वाढण्यास सुरुवात झाली. वयाच्या १६ व्या वर्षी त्यांचे वजन १२६ किलो होते.

ठळक मुद्देपुण्यातील डॉ. शशांक शहा यांनी केली शस्त्रक्रिया : आशियातील सर्वाधिक वजन

पुणे : आशियातील सर्वाधिक वजन असलेल्या पालघर जिल्ह्यातील वसई येथे राहणाऱ्या ४२ वर्षांच्या अमिता राजानी यांनी चक्क २१४ किलो वजन कमी केले, ऐकून धक्का बसला ना! पण, हे खरंय. चार वर्षांपूर्वी केलेल्या बेरिअ‍ॅट्रिक शस्त्रक्रियेमुळे त्यांना नवसंजीवनी मिळाली असून, आता त्यांचे वजन आहे ८६ किलो.  या लढ्यामध्ये पुण्यातील प्रसिद्ध बेरिअ‍ॅट्रिक सर्जन आणि लॅपरो ओबेसो सेंटरचे संस्थापक डॉ. शशांक शहा यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.वयाच्या ६ व्या वर्षापासून अमिता  यांचे वजन वाढण्यास सुरुवात झाली. वयाच्या १६ व्या वर्षी त्यांचे वजन १२६ किलो होते. आपल्या दैनंदिन क्रियासुद्धा त्या व्यवस्थितपणे करू शकत नव्हत्या. भारत आणि लंडन मधील आघाडीच्या एंडोक्रिनोलॉस्ट्सनासुद्धा त्यांच्या स्थूलपणाचे नक्की कारण सापडत नव्हते. जेव्हा त्यांचे वजन ३०० किलोपर्यंत पोहोचले, तेव्हा परिस्थिती अजूनच गंभीर झाली होती आणि त्यांना घराबाहेर पडणेही शक्य नव्हते. त्यांच्या कुटुंबीयांना त्यांची खूप काळजी वाटत होती. कारण, चालण्यापासून सगळ्या दैनंदिन क्रिया करण्यासाठी त्यांना मदतीची गरज लागत होती. त्याचप्रमाणे अमिता यांना श्वसनाच्या समस्यांमुळे आॅक्सिजनचा सपोर्ट लागत असे. त्याचप्रमाणे त्यांना शेकडो टॉवेलने पुसावे लागत असे. शस्त्रक्रियेच्या आधी ८ वर्षे त्या अंथरूणाला खिळून होत्या.पुण्यातील डॉ. शशांक शहा यांची त्यांनी भेट घेतली. अनेक वर्षांनी त्या घराबाहेर पडल्या. त्यांना अतिस्थूलपणाचा विकार होताच. त्याचबरोबर त्यांच्या कोलेस्टॉरलची पातळी असंतुलित होती, मूत्रपिंडांच्या कार्यात बिघाड झाला होता, टाईप २ प्रकारचा मधुमेह आणि श्वसनाच्याही समस्या होत्या. शस्त्रक्रियेपूर्वी दोन महिन्यांची पूर्वतयारी करण्यात आली होती. हॉस्पिटलमध्ये त्यांना विशिष्ट आहार घेण्यास सांगितला होता आणि त्यांच्यासाठी खास बेड, कपडे, वजन करण्याचे मशीन ठेवण्यात आले होते. त्यांची शस्त्रक्रिया २ टप्प्यांमध्ये पार पडली. २०१५ मध्ये त्यांच्यावर पहिल्या टप्प्यातील लॅपरोस्कोपिक स्लीव्ह गॅस्ट्रेक्टोनॉमी ही चयापचय शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर त्यांची परिस्थिती सुधारू लागली आणि त्यांचे बरेचसे वजन कमी झाले आणि त्या स्वत:हून चालू लागल्या. २०१७ मध्ये अमिता यांच्यावर दुसरी गॅस्ट्रिक बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली. त्या वेळी त्यांचे वजन १४० किलो होते. हे दोन चयापचय उपचार आणि त्यांच्या प्रयत्नांमुळे त्यांचे वजन कमी झाले.डॉ. शशांक शहा म्हणाले की, कर्करोग किंवा एचआयव्ही एवढाच स्थूलपणा हा गंभीर आजार आहे. पुरुषांच्या तुलनेने महिलांना हा आजार अधिक प्रमाणात होतो. अमिता यांच्या शस्त्रक्रियेच्या चार वर्षांनंतर त्या मधुमेह आणि रक्तदाबासारख्या आरोग्याच्या समस्यांपासून त्या दूर आहेत. त्यांचे मूत्रपिंड सामान्यपणे कार्य करत आहे. आता आम्ही अमिताची केस लिम्का बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदविण्याच्या प्रयत्नात आहोत........माझा आनंद गगनात मावेना४आधी मी अंथरूणाला खिळलेली होते व आता मी स्वतंत्र आहे व मुक्तपणे हालचाल करू शकते. मी आवडीचे कपडे घालू शकते व मला हवे तसे आयुष्य जगू शकते. माझ्या आनंदाला पारावार राहिलेला नाही, असे अमिता राजानी यांनी सांगितले. .....

टॅग्स :Puneपुणेpalgharपालघरdoctorडॉक्टरWeight Loss Tipsवेट लॉस टिप्सWomenमहिला