रात्रीच्या वेळी महिलांचा एसटी प्रवास होणार सुरक्षित

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2021 06:46 AM2021-09-29T06:46:36+5:302021-09-29T06:47:05+5:30

दिवे सुरू ठेवण्याचे आदेश

Womens ST travel at night will be safer lights will keep on pdc | रात्रीच्या वेळी महिलांचा एसटी प्रवास होणार सुरक्षित

रात्रीच्या वेळी महिलांचा एसटी प्रवास होणार सुरक्षित

Next
ठळक मुद्देदिवे सुरू ठेवण्याचे आदेश

मुंबई : रात्रीच्या वेळी एकट्या महिलांना बाजूला बसलेल्या प्रवाशांकडून त्रास होऊ नये, यासाठी रेल्वेप्रमाणे एसटीमध्ये दिवे लागणार आहेत. याबाबतचे आदेश वाहतूक महाव्यवस्थापक सुहास जाधव यांनी विभाग नियंत्रकांना दिले आहेत. 

सुहास जाधव यांनी सांगितले की, काही वेळेस एकटी स्त्री रात्री प्रवास करते. तिला त्यांच्या शेजारी सीटवर बसलेल्या समाजकंटक पुरुषाकडून त्रास दिला जाऊ शकतो. त्यामुळे एसटीत रेल्वेच्या धर्तीवर दिव्यांची सुविधा असावी. एकटी स्त्री एसटीने प्रवास करत असल्यास तिने दिवे बंद न करण्याची सूचना केल्यास दिवे बंद करू नयेत. याबाबतच्या सूचना वाहक आणि चालकांना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.दिवे सुरू ठेवण्याचे आदेश
 

Web Title: Womens ST travel at night will be safer lights will keep on pdc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.