शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
5
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
8
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
9
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
10
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
11
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
12
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
13
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
14
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
15
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
16
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
17
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
18
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
19
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
20
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर

मुंबईत महिला असुरक्षित, घरात, रस्त्यावर तसेच ट्रेनमध्येही छेडछाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 6:00 AM

मुंबईत महिला सुरक्षित नसल्याचे गेल्या तीन दिवसांत शहरात घडलेल्या घटनांनी पुन्हा एकदा समोर आले आहे.

मुंबई : मुंबईत महिला सुरक्षित नसल्याचे गेल्या तीन दिवसांत शहरात घडलेल्या घटनांनी पुन्हा एकदा समोर आले आहे. वर्सोव्यात दोन तरुणींचा पाठलाग करत विनयभंग करण्यात आला. तर छेडछाडीच्या भीतीमुळे विद्यार्थिनीने चालत्या ट्रेनमधून उडी मारल्याची घटना करी रोडमध्ये घडली. लोकलमध्ये तरुणीला पाहून अश्लील कृत्य करणाºया तरुणाला पोलिसांनी अटक केली. तर भिवंडीत घरात घुसून तरूणीची छेड काढण्यात आली.रिक्षातून घरी परतणाºया दोन तरुणींचा मोटारसायकलवरून पाठलाग करत विनयभंग करणाºया तिघांना पोलिसांनी अटक केली. राहुल शेवाळे (२५), आदिल खान (२१) आणि योगेश शेवाळे (२४) अशी त्यांची नावे असून ते सर्व जण जुहू-वर्सोवा लिंक रोडजवळील झोपडपट्टीत राहतात.शनिवारी एक तरुणी तिच्या भावासोबत जेवायला हॉटेलमध्ये गेली होती. त्यानंतर त्यांची आणखी एक मैत्रीण त्यांना भेटली. ते तिघेही रिक्षातून घरी परतत होते. जुहू-वर्सोवा लिंक रोडवर असलेल्या गीता नगरजवळ दारूच्या नशेत असलेल्या तिघा तरुणांनी त्यांच्या रिक्षाचा पाठलाग केला. तरुणींच्या दिशेने अश्लील शेरेबाजी करू लागले. रिक्षाचालकाने त्यांच्याकडे दुर्लक्ष करत गाडी वेगाने पळविण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी मोटारसायकल आडवी घालत त्यांना अडविले. एकाने तरुणीला रिक्षातून खेचण्याचा प्रयत्न केला. तरुणीच्या भावाने तसेच रस्त्यावरून जात असलेल्या एका व्यक्तीनेही त्यांना अडविले असता त्यांना मारहाण करण्यात आली. याबाबत पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी धाव घेत पोलिसांनी त्या तिघांनाही अटक केली.>छेडछाडीच्या घटनांबाबत अहवाल सादर कराराजधानी मुंबईसह राज्यात विविध ठिकाणी महिलांच्या छेडछाडीची प्रकरणे उघडकीस येत आहेत. राज्य महिला आयोगाने या घटनांची गंभीर दखल घेत संबंधित यंत्रणांना अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. पुणे जिल्ह्यातील धायरी येथे अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या केल्याचे उघडकीस आले. महिला आयोगाने या प्रकरणाची स्वत:हून दखल घेत पुणे पोलीस आयुक्तांकडून अहवाल मागविला आहे. तर, मुंबईत कुर्ला आणि सीएसएमटी स्थानकाजवळ लोकल ट्रेनमधील छेडछाडीच्या घटनेचीही आयोगाने दखल घेतली आहे. कुर्ला येथे छेडछाडीला विरोध करणाºया अल्पवयीन मुलीला झालेल्या मारहाणीबाबत मुंबई पोलीस आयुक्तांकडून तर लोकल ट्रेनमधील घटनेबाबत रेल्वे पोलीस आयुक्तांना अहवाल सादर करण्याचे निर्देश आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी दिले.चालत्या ट्रेनमधूनविद्यार्थिनीची उडीछेडछाडीच्या भीतीमुळे पायल कांबळे या विद्यार्थिनीने चालत्या ट्रेनमधून उडी मारल्यामुळे ती जखमी झाली आहे. रविवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून करी रोडला जात असताना हा तरुण महिला डब्यात चढला. या वेळी छेडछाडीच्या भीतीमुळे पायलने चालत्या ट्रेनमधून उडी मारली. यामुळे तिच्या पायाला व डोक्याला गंभीर दुखापत झाली.क्लासला जाण्यासाठी उशीर होत असल्यामुळे सेकंड क्लास महिला डब्यात चढली. त्या वेळी पायल एकटी डब्यात होती. ट्रेनचा वेग कमी असल्यामुळे तरुणही डब्यात आला. त्या तरुणाने पायलशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. तो जवळ येण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे पायलने लोकलमधून उडी मारली. गँगमनने जखमी अवस्थेत तिला रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे. पायलने आरोपीचे वर्णन केले आहे. त्यानुसार विशेष पथकेआरोपीच्या शोधासाठी रवाना करण्यात आली आहेत.विनयभंग प्रकरणीचौघांवर गुन्हा दाखलभिवंडी : शहरातील कापतलाव भागात तरुणीची छेडछाड करून तिला वाममार्गाला लावण्याची धमकी देणाºया चौघांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पीडित महिला ही कापतलाव येथे राहते. रविवारी ती घरात एकटी असताना तिच्या घराच्या आसपास राहणारे सरफराज, फिरोज, रिजवान आणि तोतला हे चौघे जबरदस्तीने घरात घुसले. तिची छेड काढली. या घटनेने घाबरलेल्या महिलेने चौघांविरोधात गुन्हा दाखल केला.तसेच लोकल ट्रेनमध्ये महिलांची होणारी छेडछाड, महिलांमध्ये प्रवासादरम्यान असणारी असुरक्षिततेची भावना आदी लक्षात घेऊन याबाबत योग्य कार्यवाही करण्याच्या सूचनाही रहाटकर यांनी दिल्या.

टॅग्स :Molestationविनयभंग