VIDEO- शिवसेना विभागप्रमुखाला महिला शिवसैनिकाने लगावली कानशिलात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2018 13:47 IST2018-03-30T12:05:13+5:302018-03-30T13:47:02+5:30

एका महिला शिवसैनिकाने शिवसेनेच्याच विभागप्रमुखाला कानाखाली लगावल्याची घटना घडली आहे.

Woman shivsainik slaps Rajendra Raut Shivsena Vibhagpramukh in Mumbai | VIDEO- शिवसेना विभागप्रमुखाला महिला शिवसैनिकाने लगावली कानशिलात

VIDEO- शिवसेना विभागप्रमुखाला महिला शिवसैनिकाने लगावली कानशिलात

मुंबई: एका महिला शिवसैनिकाने शिवसेनेच्याच विभागप्रमुखाला कानाखाली लगावल्याची घटना घडली आहे. शिवसेनेचे विभागप्रमुख राजेंद्र राऊत यांना महिला शिवसैनिकाने कानशिलात लगावली.  गोवंडी इथं आयोजित कार्यक्रमात ही घटना घडली आहे. पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीवरुन हा वाद सुरू झाल्याचं समजतं आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला असून व्हिडीओमध्ये महिला शिवसेनेच्या विभागप्रमुखांना कानशिलात लगावत असल्याचं स्पष्टपणे पाहायला मिळतं आहे. 

काही दिवसांपूर्वीच शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती झाली होती. मात्र काही महिलांचा यावर आक्षेप होता. याबाबतचा जाब त्यांनी विभागप्रमुखांना विचारला. विभागप्रमुख राजेंद्र राऊत हे कार्यक्रमानिमित्त देवनार इथं आले होते. त्यावेळी त्यांच्याकडे महिलांनी विचारणा केली.

राजेंद्र राऊत मंचावरुन खाली आल्यानंतर, महिलांनी त्यांना घेराव घातला. त्याचवेळी एका महिलेने वादावादीत राजेंद्र राऊत यांच्या कानशिलात लगावली. याप्रकारामुळे उपस्थितांमध्ये एकच खळबळ उडाली. 

Web Title: Woman shivsainik slaps Rajendra Raut Shivsena Vibhagpramukh in Mumbai