छेड काढणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या माजी प्रदेशाध्यक्षांना महिलेने चपलेने मारले
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 00:08 IST2025-07-24T00:07:38+5:302025-07-24T00:08:28+5:30
Crime News: एका महिलेची छेड काढणं संभाजी ब्रिगेडच्या माजी प्रदेशाध्यक्षांना चांगलंच महागात पडलं आहे. छेड काढल्याचा आरोप करत या महिलेने संभाजी ब्रिगेडच्या माजी प्रदेशाध्यक्षांना मारहाण केल्याची घटना अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथे घडली आहे.

छेड काढणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या माजी प्रदेशाध्यक्षांना महिलेने चपलेने मारले
एका महिलेची छेड काढणं संभाजी ब्रिगेडच्या माजी प्रदेशाध्यक्षांना चांगलंच महागात पडलं आहे. छेड काढल्याचा आरोप करत या महिलेने संभाजी ब्रिगेडच्या माजी प्रदेशाध्यक्षांना मारहाण केल्याची घटना अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथे घडली आहे. डॉ. गजानन पारधी असं या संभाजी ब्रिगेडच्या माजी प्रदेशाध्यक्षांचं नाव असून, या महिलेने त्यांना चपलेने मारहाण केली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार गजानन पारधी हे संभाजी ब्रिगेडचे माजी प्रदेशाध्यक्ष आहे. त्यांनी आपली छेड काढल्याचा आरोप करत एका महिलेने गोंधळ घातला. तसेच पारधी यांना चपलेने मारहाण केली. मात्र या प्रकरणात अद्यापपर्यंत कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
दरम्यान, या घटनेची गंभीर दखल संभाजी ब्रिगेडने घेतली असून, पक्षविरोधी कारवाया आणि संघटनेची प्रतिमा मलिन केल्याचा ठपका ठेवत पारधी यांना बडतर्फ कऱण्यात आलं आहे.