शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
2
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
3
आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
4
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
5
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
6
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
7
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
8
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
9
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
10
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
11
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
12
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
13
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
14
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
15
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
16
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
17
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!
18
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
19
जयदीप अहलावतने दोन आठवड्यामध्ये अंधेरीत खरेदी केलं आणखी एक घर, किंमत आहे कोटींच्या घरात
20
Maharashtra Cabinet: आणीबाणीतील बंदीवानांचे मानधन दुप्पट

‘वंचित’शिवाय की ‘वंचित’सह? वंचित नसेल तर काय? आधी मागितल्या १५ जागांची, मग ५ वर! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2024 06:52 IST

जागावाटप अंतिम टप्प्यात असून, प्रमुख नेत्यांच्या बैठकीत शिक्कामोर्तब होईल, असे शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस व राष्ट्रवादी (शरद पवार)कडून सांगण्यात येत होते. मात्र, बुधवारी झालेल्या बैठकीत वंचितच्या मागणीवर तोडगा निघाला नाही. 

मुंबई : वंचित बहुजन आघाडीमुळे महाविकास आघाडीचे जागावाटपाचे घोडे पुढे सरकत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिलेला जागांच्या फॉर्म्युल्यावर बुधवारच्या बैठकीत एकमत होऊ शकले नाही. त्यांच्याकडून आता नवा प्रस्ताव येणार असून, ९ मार्चला होणाऱ्या बैठकीत त्यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.

जागावाटप अंतिम टप्प्यात असून, प्रमुख नेत्यांच्या बैठकीत शिक्कामोर्तब होईल, असे शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस व राष्ट्रवादी (शरद पवार)कडून सांगण्यात येत होते. मात्र, बुधवारी झालेल्या बैठकीत वंचितच्या मागणीवर तोडगा निघाला नाही. 

वंचित नसेल तर काय? वंचितची मागणी पूर्ण करणे शक्य नसल्यास तिन्ही पक्षांनी जागावाटप निश्चित केल्याचे समजते. त्यानुसार शिवसेना ठाकरे गट सर्वाधिक २३, काँग्रेस १६ व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) ९ जागा लढविणार आहे. 

१५ ओबीसी उमेदवार द्या वंचितने जागावाटप करताना १५ ओबीसी, तर ३ अल्पसंख्याक उमेदवार देण्याची भूमिका मांडली; मात्र, त्यावर चर्चा झाली नाही, अशी माहिती वंचितचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी दिली. 

‘पुढच्या बैठकीत ठरेल’ : सध्या मी काहीही बोलणार नाही. तुम्हाला नंतर ब्रिफिंग होईल. मी अजून कशात नाही. पुढच्या बैठकीमध्ये सगळे ठरेल, असे प्रकाश आंबेडकर बैठकीतून बाहेर पडल्यावर म्हणाले.

आधी १५ जागांची मागणी, मग ५ वर -बैठकीला येण्याआधी वंचितकडून १५ जागांची मागणी करण्यात येत होती. मात्र, प्रत्यक्षात बैठकीत रामटेक, दिंडोरी, सोलापूर, अमरावती आणि अकोला या पाच जागांची मागणी करण्यात आली. मात्र, आघाडी ३ जागा देण्यास तयार असल्याचे समजते. त्यातील २ जागा या शिवसेनेच्या कोट्यातून, तर उर्वरित जागा कोण सोडणार हे अद्यापही ठरलेले नाही. 

 

टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसlok sabhaलोकसभा