शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
4
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
5
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
6
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
7
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
8
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
9
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
10
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
11
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
12
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
13
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
14
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
15
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
16
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
17
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
18
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
19
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
20
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा

जीवघेण्या अपघातात सर्वाधिक प्रमाण विनाहेल्मेटचे ; ५ हजार २५२ दुचाकीस्वारांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2019 13:53 IST

हेल्मेट न वापरणे, अतिवेगाने वाहन चालविणे आणि सिटबेल्टचा वापर न करणे, अशा तीन प्रमुख कारणे प्राणघातक अपघाताचे प्रमाण अधिक असल्याचे सांगण्यात आले़.

ठळक मुद्दे५ हजार २५२ दुचाकीस्वारांचा मृत्यू; बळींमध्ये ३९.६ टक्क्यांनी परिधान केले नव्हते हेल्मेट

- विवेक भुसे- पुणे : महाराष्ट्रातील प्राणघातक अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून २०१८ मध्ये रस्त्यावरील अपघातात १३ हजार २६१ जणांचा मृत्यु झाला़. त्यात हेल्मेट परिधान न केलेल्या ५ हजार २५२ जणांचा समावेश असून हे प्रमाण ३९ ़६ टक्के इतके प्रचंड आहे़. त्याखालोखाल ओव्हर स्पिडिंग (अतिवेग)मुळे ३ हजार ९२६ जणांना (२९़६ टक्के) आपले प्राण गमवावे लागले आहेत़. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक  बुधवारी (दि. ३१) मुंबईत झाली़. या बैठकीत ही माहिती देण्यात आली़. देशातील अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी बुधवारी संसदेने मोटार वाहन कायद्यातील तरतुदीत दुरुस्ती करणारे विधेयक मंजूर केले़. त्या पार्श्वभूमीवर या बैठकीत राज्यातील वाढत्या अपघाताबाबत चर्चा करण्यात आली़. राज्यात २०१८ मध्ये २० हजार ३३५ जण विविध अपघातात गंभीर जखमी झाले तर, ११ हजार ३० किरकोळ जखमी झाले होते़. त्यात दुचाकीस्वार व सहप्रवाशांची संख्या मोठी आहे़. हेल्मेट परिधान न करणारे ६ हजार ४२० (३१़६ टक्के) गंभीर जखमी झाले होते तर, ३ हजार ५५१ (३२़१ टक्के) किरकोळ जखमी झाले होते़. अतिवेगामुळे ५ हजार ६२३ (२७़७टक्के)गंभीर जखमी झाले असून ३ हजार ६० (२८ टक्के) किरकोळ जखमी झाले होते़. 

मोटारीच्या अपघातात प्रामुख्याने सिटबेल्टचा वापर न केल्याने १ हजार ६५६ (१२़५ टक्के) आपले प्राण गमवावे लागले होते़. तसेच २ हजार ९२१ (१४़३ टक्के) गंभीर जखमी तर १ हजार ७१३ जण (१५़५ टक्के) किरकोळ जखमी झाले होते़. हेल्मेट न वापरणे, अतिवेगाने वाहन चालविणे आणि सिटबेल्टचा वापर न करणे, अशा तीन प्रमुख कारणे प्राणघातक अपघाताचे प्रमाण अधिक असल्याचे सांगण्यात आले़. रॉग साईटने येणाºयामुळे ३८४ (३टक्के) जणांच्या प्राणावर बेतले असून वाहन चालविताना मोबाईलवर बोलण्याने झालेल्या अपघातात ५५ (०़४ टक्के) जणांनी प्राण गमावले़ दारू पिऊन गाडी चालविणाºया ४२ जणांना (०़३ टक्के) मृत्युने गाठले होते़ लाल दिवा ओलंडल्याने अपघात होऊन १६ जणांचा मृत्यु झाला़.......पुणे शहरात जानेवारी ते जुलै अखेर झालेल्या अपघातात हेल्मेट परिधान न केलेल्या ४७ जणांना अपघाती मृत्यु झाला आहे़ त्यात ३६ जण चालक होते तर ११ जण सहप्रवासी होते़ तर, हेल्मेटधारक ६ जण मृत्युमुखी पडले आहेत़ तसेच विना हेल्मेट १३४ गंभीर जखमी झाले आहेत. त्यात ९९ वाहनचालक असून ३ सहप्रवासी आहेत़. हेल्मेटधारक तिघे गंभीर जखमी झाले आहेत़.  जुलै अखेर प्राणघातक अपघातात ५९ जणांचा मृत्यु झाला़. अतिवेगामुळे झालेल्या अपघातात ५३ जणांचा मृत्यु झाला असून ११५ जण गंभीर जखमी झाले आहेत़. .....राज्यातील व पुण्यातील प्राणघातक व गंभीर अपघात पाहिले तर विना हेल्मेट असलेल्यांची संख्या भयंकर आहे़. हेल्मेट विना असलेल्यांची गंभीर जखमी असलेल्यांची संख्या अधिक आहे़. हेल्मेट असलेले इतके गंभीर जखमी नाहीत हे महत्वाचे आहे़ डॉ़ के़ व्यंकटेशम, पोलीस आयुक्त, पुणे

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघातDeathमृत्यूPoliceपोलिस