नोट चोरी बंद झाल्याने वोट चोरीची आठवण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 10:28 IST2025-11-03T10:28:06+5:302025-11-03T10:28:42+5:30
"मतदार याद्यातील चुका आम्हीही अनेकदा दाखवून दिल्यात"

नोट चोरी बंद झाल्याने वोट चोरीची आठवण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: ज्यांची नोट चोरी बंद झाली, त्यांना वोट चोरीची आठवण झाली. त्यांना पराभव समोर दिसतो आहे. या निवडणुकीत जिंकू शकत नाही हे त्यांना माहीत आहे. त्यामुळे निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी ते करत आहेत, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या शनिवारच्या मोर्चाचा समाचार घेतला.
मतदार याद्यांत चुका मान्य
मतदार याद्यात चुका नाहीत हे आम्ही कधीच नाकारलेले नाही. आम्हीही अनेकदा त्या चुका, दुबार नावे दाखवून दिली आहेत. प्रश्न आहे की जे दुबार मतदार आहेत त्यांनी दोन्ही ठिकाणी मतदान केले आहे, हे दाखवावे लागेल. आमच्याकडे यांच्या मतदारसंघातील अशी माहिती आहे, जी समोर आणली तर यांना उत्तर देता येणार नाही. हे सगळे मतचोरी करून निवडून आले आहेत हे आम्ही लवकरच दाखवू, अशा इशाराही मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांना दिला आहे.