जादुटोण्याच्या संशयावरून वृद्धाचा खून!
By Admin | Updated: January 3, 2017 21:48 IST2017-01-03T21:48:42+5:302017-01-03T21:48:42+5:30
जादुटोणा करित असल्याचा संशय घेत ६५ वर्षीय वृद्धाचा काठी व दगडाने ठेचून खून करण्यात आला. ही घटना ३ जानेवारी रोजी सकाळी

जादुटोण्याच्या संशयावरून वृद्धाचा खून!
ऑनलाइन लोकमत
अनसिंग (वाशिम), दि. 3 - जादुटोणा करित असल्याचा संशय घेत ६५ वर्षीय वृद्धाचा काठी व दगडाने ठेचून खून करण्यात आला. ही घटना ३ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी आरोपी अजय धोंगडे (वय २१ वर्षे) यास सायंकाळी पोलिसांनी अटक केली आहे.
मृतक बाळाजी गुणाजी धोंगडे (वय ६५ वर्षे) यांची मुलगी सीमा बाळाजी धोंगडे हिने अनसिंग पोलिसांत यासंदर्भात दाखल केलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे, की आई-वडिलांना जादुटोणा करून आजारी केल्याचा संशय घेवून गावातीलच अजय धोंगडे, त्याचा साथीदार सुरज धोंगडे आणि दिलीप धोंगडे यांनी आपल्या वडिलांची दगड व काठीने ठेचून हत्या केली. अशा आशयाच्या फिर्यादीवरून अनसिंग पोलिसांनी आरोपी अजय गजानन धोंगडे यांस अटक केली असून सुरज धोंगडे आणि दिलीप धोंगडे हे दोन आरोपी फरार झाले आहेत. तथापि, भरदिवसा घडलेल्या खूनाच्या या घटनेमुळे अनसिंग परिसरात खळबळ उडाली असून याप्रकरणी अनसिंग पोलिस पुढील तपास करित आहेत.