शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे सिग्नलची वायर कापून अडवत लुटणारी टोळी अटकेत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2018 22:18 IST

मागील तीन ते चार महिन्यात राज्यभरात ३६ ठिकाणी रेल्वे सिग्नलची वायर कापून रेल्वे थांबल्यावर प्रवाशांना लुटल्याचे समोर आले आहे़. 

ठळक मुद्देएक कार व दुचाकी, वायर कापण्यासाठी लागणारे कटर जप्त१० ते १२ जण असून गुन्हा केल्यानंतर ते दुचाकीवरून पळून जात असल्याचे समोर रेल्वेची सिग्नल यंत्रणा प्रभावित करत चोरी करण्याच्या घटनांमध्ये वाढ

पुणे : राज्यात विविध ठिकाणी रेल्वे सिग्नलची वायर कापून रेल्वे थांबल्यानंतर प्रवाशांच्या ऐवजावर डल्ला मारणाऱ्या टोळींपैकी तिघांना रेल्वे सुरक्षा बलाच्या पथकाने अटक केली आहे. रोहित गणेश रारेभात, बाबू मोहन कसबे, विनोद सखाराम जाधव (तिघेही रा. जामखेड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या टोळीमध्ये १० ते १२ जणांचा समावेश असून त्यांनी मागील तीन ते चार महिन्यात राज्यभरात ३६ ठिकाणी रेल्वे सिग्नलची वायर कापून रेल्वे थांबल्यावर प्रवाशांना लुटल्याचे समोर आले आहे़.  त्यांच्याकडून एक कार व दुचाकी, वायर कापण्यासाठी लागणारे कटर जप्त करण्यात आले आहे. याबाबत रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त डी़ विकास, सहायक सुरक्षा आयुक्त बी़ के़ मकरारिया यांनी माहिती दिली़.  मागील काही दिवसांपासून सातारा, पुणे विभागात कटरच्या साह्याने सिग्नल वायर कापून रेल्वेची सिग्नल यंत्रणा प्रभावित करत चोरी करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करूनही या घटनांमध्ये वाढ झाली होती. १३ सप्टेबर रोजी पुणे सातारा विभागातील पळशी स्टेशनवर पुन्हा अशी घटना घडली होती. त्याअनुषंगाने सातारा येथील आरपीएफ निरीक्षक यांनी या घटनांचा बारकाईने अभ्यास केला. तेव्हा चोरी करणारे १० ते १२ जण असून गुन्हा केल्यानंतर ते दुचाकीवरून पळून जात असल्याचे समोर आले. त्यानंतर  आरपीएफचे निरीक्षक अजय संसारे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक येथील जीआरपी व सातारा येथील आरपीएफच्या संयुक्त पथकाने नाशिक परिसरात त्यांचा शोध घेऊन तिघांना अटक केली. तिघांनीही या घटनांमध्ये चोरी केल्याचे कबूल केले. त्यांच्या साथीदारांचा शोध घेतला जात आहे़.या ३६ गुन्ह्यांची नोंद वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात झाली असून त्यात किती माल चोरीला गेला होता, याचा शोध घेतला जात आहे़.  

चोरीसाठी वापरायचे रेल्वे अ‍ॅपचोरी करावयाच्या ट्रॅकवर कोणती रेल्वे येणार आहे. हे पाहण्यासाठी तिघेही मोबाईलवरून त्या ट्रॅकवरील रेल्वेचे लोकेशन पाहत असत. त्यानंतर ती जवळ आली की रेल्वेची सिग्नल वायर कापत. वायर कापल्यावर रेल्वेला लाल सिग्नल दिसला की रेल्वे थांबल्यावर आतील प्रवाशांच्या मोबाईल, सोने यांवर डल्ला मारत असत. आपली ओळख पटू नये, म्हणून ते गुन्हा करावयाच्या जागेपासून २ ते ३ किमी अगोदर मोटार, दुचाकी पार्क करीत व तेथून चालत जाऊन गुन्हा करीत असत़. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसrailwayरेल्वेArrestअटक