महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 06:25 IST2025-12-27T06:24:52+5:302025-12-27T06:25:06+5:30

Cold Wave Maharashtra: ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले की, नव्या वर्षाच्या प्रारंभी गारठा असेल. ३१ डिसेंबर व १ जानेवारी रोजी पारा घसरताच राहिल.

Winter Weather Alert: The mercury will drop further across Maharashtra! Welcome the New Year with a cold snap, be prepared... | महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...

महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : उत्तर भारतातील थंड वाऱ्यामुळे महाराष्ट्रातील किमान तापमानात घसरण कायम असून नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्याने होणार आहे. शुक्रवारी मुंबईचे किमान तापमान १६ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. तर अनेक शहरांचे तापमान १० ते १२ अंशापर्यंत घसरले.

ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले की, नव्या वर्षाच्या प्रारंभी गारठा असेल. ३१ डिसेंबर व १ जानेवारी रोजी पारा घसरताच राहिल. हवामान अभ्यासक अथ्रेय शेटटी यांनी सांगितले की, हिमालय किंवा आसपासच्या परिसरात म्हणावी तशी बर्फवृष्टी झालेली नाही. उत्तराखंड किंवा हिमाचलच्या खालील भागात बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम म्हणून वर्षाच्या शेवटी आणि सुरुवातीला गारठा वाढेल. 

शहरकिमान तापमान (अंश सेल्सिअस)
जेऊर८.५
गोंदिया९.४
नाशिक९.६
मालेगाव९.८
भंडारा१०
यवतमाळ१०
नांदेड१०.५
नागपूर१०.६
सातारा११
परभणी११.१
छ. संभाजीनगर११.२
गडचिरोली११.४
वाशिम११.६
महाबळेश्वर११.७
वर्धा११.९
सांगली१२
धाराशिव१२
अमरावती१२
अकोला१२.३
चंद्रपूर१२.४

Web Title: Winter Weather Alert: The mercury will drop further across Maharashtra! Welcome the New Year with a cold snap, be prepared...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Winterहिवाळा