शहरं
Join us  
Trending Stories
1
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
2
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
3
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
4
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
5
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
6
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
7
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
8
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
9
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
10
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
11
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
12
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
13
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
14
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
15
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
16
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
17
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
18
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
19
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
20
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

मद्यपी पोलिसांचा वरातीत धुडगूस

By admin | Updated: June 5, 2015 23:47 IST

अकोल्यातील घटना ; युवकांनी चोपले.

हिवरखेड ( जि. अकोला) : लग्नाच्या वरातीत धुडगूस घालणार्‍या मद्यपी पोलिसांना गावातील काही युवकांनी चोप दिल्याची घटना बुधवारी रात्री घडली. हिवरखेड येथे एका पोलिसाच्या कुटुंबात लग्न होते. आकोट आणि अकोला येथील पोलिसांना त्यासाठी निमंत्रित करण्यात आले. वरातीमध्ये सहभागी झालेल्या काही पोलिसांनी मद्यपान केले होते. त्यांनी रस्त्याच्या कडेला उभी असलेली वाहने आणखी बाजूला घेण्यासाठी आग्रह धरला. ते जाणार्‍या-येणार्‍यांना त्रासही देत होते. या पोलिसांची गावातील काही युवकांनी समजूत काढली; मात्र त्यांनाच या पोलिसांनी शिवीगाळ आणि धक्काबुक्की केली. त्यामुळे काही युवकांनी या मद्यपी पोलिसांना चोप दिला. त्यामुळे पोलिसांनी गावातून काढता पाय घेतला, अशी माहिती प्रत्यक्षदश्रींनी दिली. यासंदर्भात हिवरखेड येथील प्रभारी ठाणेदार अशोक सुर्यवंशी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी वरातीत मारहाण झाल्याची कोणतीही तक्रार प्राप्त झालेली नसल्याचे स्पष्ट करून तक्रार प्राप्त झाल्यास त्यानुसार पुढील कारवाईबाबत निर्णय घेण्यात येईल, असे सांगीतले.