शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi: ११ फूट रुंद, २२ फूट लांब, १९१ फूट उंच; पंतप्रधान मोदी राम मंदिराच्या शिखरावर फडकवणार भगवा ध्वज!
2
IND vs SA: गुवाहाटी कसोटीत भारताचा विजय अशक्य का? आतापर्यंत एकदाच गाठलाय ३००+ स्कोर!
3
आजचे राशीभविष्य, २५ नोव्हेंबर २०२५: प्रियजनांचा सहवास लाभेल, प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल!
4
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हाेणार की पुढे ढकलणार? आज फैसला, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे राज्याचे लक्ष
5
बिग बॉस मराठी ६ लवकरच...! अखेर झाली घोषणा, कोण असणार होस्ट? प्रेक्षकांची वाढली उत्सुकता
6
अयोध्या नगरीत श्रीराम मंदिरावर आज दिमाखात फडकणार भगवा ध्वज, वास्तूचे काम पूर्ण झाल्याचे प्रतीक; ध्वजावर तेजस्वी सूर्य, ॐ ही प्रतीकेही, अयोध्येत कडक सुरक्षा
7
‘अनामिक’ रोख देणग्यांबद्दल कोर्टाची भाजप, काँग्रेस आणि सरकारला नोटीस!
8
सिम इतरांना द्याल तर तुरुंगात जाल, दूरसंचार विभागाचा इशारा
9
पती, सासरच्या जाचापायी राज्यात २,३७३ महिलांनी संपविले जीवन, २०२३ मध्ये देशभरात २४ हजार जणींनी उचललं टोकाचं पाऊल
10
कुणावरही टीकाटिप्पणी नाही, केवळ विकासाचे मुद्दे, मुख्यमंत्री प्रचारात फडणवीसांचा व्हिजनवर भर, विरोधकांवरही टीका नाही
11
चायनीज तैपईला नमवून भारताच्या महिला कबड्डीपटूंनी पटकावला विश्वचषक
12
१५ वर्षांत कोणती वस्तू किती महागली? खिसा कसा रिकामा?
13
भारतीय वंशाचे उद्योगपती मित्तल सोडणार ब्रिटन, समोर येतंय असं कारण
14
कर्ज हवे? चिंता करू नका; तुमचे भविष्य सुरक्षित, तर बॅंका निश्चिंत
15
कंपन्यांच्या पगार खर्चात १०% वाढ होणार, नव्या कायद्यामुळे भार; अनेक जबाबदाऱ्याही पडणार
16
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? शांतता योजनेचा मसुदा तयार; पण युक्रेनसमोर मोठे दुहेरी संकट!
17
भारताशेजारील देशांमध्ये भूकंपांची मालिका सुरूच, आता या देशात भूकंपाचे धक्के; किती होती तीव्रता?
18
इथिओपियात ज्वालामुखी उद्रेक; राखेचे ढग भारताच्या दिशेने, DGCA चा विमान कंपन्यांना अलर्ट जारी
19
नागपुरातील पत्रकार परिषदेत भडकले होते 'ही मॅन' धर्मेंद्र; कंधार विमानाचे अपहरण अन् पाजीचा सच्चेपणा...
20
युपी विधानसभा, रेल्वे स्टेशन आणि शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी; राजधानीत हायअलर्ट
Daily Top 2Weekly Top 5

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हाेणार की पुढे ढकलणार? आज फैसला, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे राज्याचे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 07:28 IST

Maharashtra Local Body Election: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात अत्यंत महत्त्वाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी होणार असून जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकांचे भवितव्य त्या निमित्ताने निश्चित होणार असल्याने या सुनावणीकडे इच्छुक उमेदवारांसह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. 

मुंबई - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात अत्यंत महत्त्वाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी होणार असून जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकांचे भवितव्य त्या निमित्ताने निश्चित होणार असल्याने या सुनावणीकडे इच्छुक उमेदवारांसह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. 

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडू नका आणि तसे केले तर निवडणुकांना स्थगिती देण्याचा  इशारा सर्वोच्च न्यायालयाचे न्या. सूर्य कांत आणि न्या. जाॅयमला बागची यांनी १७ नोव्हेंबरला सुनावणी दरम्यान दिला होता. 

आमच्या यापूर्वीच्या आदेशाचा चुकीचा अर्थ काढून ५० टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण लागू करण्याच्या राज्य सरकारच्या कृतीवर न्यायालयाने तीव्र नाराजीही व्यक्त केली होती. त्याचवेळी राज्यातील बऱ्याच महापालिका, नगर परिषदा, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांमध्ये आरक्षणाची ही मर्यादा ओलांडली गेली असल्याची बाब समोर आली होती. 

जि.प., महापालिका निवडणुकांचे काय?नगर परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जारी आहे, त्यासाठीचे मतदान २ डिसेंबरला होणार आहे. जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही.

टांगती तलवार कायमस्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षणासंदर्भात दाखल याचिकेवर न्या. सूर्य कांत आणि न्या. जॉयमला बागची यांच्यासमोर १९ नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार होती पण ती २५ नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलली होती. आता उद्या ही सुनावणी होणार असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरील टांगती तलवार लक्षात घेता या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीद्वय हे काय निर्णय देतात ते महत्त्वाचे असेल.

काय असू शकतील पर्याय?सर्वोच्च न्यायालयाने आधीच्या निकालात (६ ऑक्टोबर) महाराष्ट्रातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारीपर्यंत घेण्याचे आदेश दिलेले होते. त्यानुसार निवडणूक कार्यक्रम राबविण्यास सर्वोच्च न्यायालय सांगते की ५०% आरक्षण मर्यादा निश्चित करून मगच निवडणुका घ्या असे आदेश देते यावर निवडणुकांचे भवितव्य अवलंबून असेल.५० टक्क्यांच्या मर्यादेतच निवडणूक घेण्यास सांगितले तर त्यासाठी काही महिन्यांचा कालावधी राज्य निवडणूक आयोगाला लागेल आणि निवडणुका पुढे ढकलल्याशिवाय पर्याय नसेल.२०२२ पूर्वीच्या आरक्षण स्थितीनुसारच या निवडणुका घ्या असे आदेश सर्वोच्च न्यायलयाने पूर्वी दिले होते, त्यानुसारच पुढे जाण्यास मंगळवारच्या सुनावणीत सांगितले तर डिसेंबरमध्ये जिल्हा परिषद तर जानेवारीत महापालिका निवडणूक होईल.

English
हिंदी सारांश
Web Title : Local Body Elections: Decision Today; Court's Verdict Awaited

Web Summary : Maharashtra awaits the Supreme Court's decision on local body elections, crucial due to reservation limit concerns. The court previously warned against exceeding 50% reservation, potentially delaying polls. Options include adhering to the limit, requiring recalculations and postponement, or proceeding with pre-2022 reservation status, enabling timely elections.
टॅग्स :Local Body Electionस्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकMaharashtraमहाराष्ट्रSupreme Courtसर्वोच्च न्यायालय