शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होणार का?; उद्धव सेना उमेदवार उतरवण्याच्या तयारीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2024 06:19 IST

भाजपकडून पंकजा मुंडेंचे पुनर्वसन; फुके, खोत, टिळेकर, गोरखेंना संधी

मुंबई - भाजपने विधानपरिषद निवडणुकीसाठी पंकजा मुंडे, सदाभाऊ खोत, परिणय फुके, योगेश टिळेकर आणि अमित गोरखे यांना उमेदवारी दिली आहे. ओबीसींना उमेदवारीत झुकते माप देण्यात आले आहे. ११ जागांसाठीची ही निवडणूक होणार की बिनविरोध निवडले जाणार, हा सस्पेंस आहे.  

बीड लोकसभेला पराभूत झालेल्या पंकजा मुंडे यांचे राजकीय पुनर्वसन करण्यात आले आहे. परिणय फुके हे कुणबी समाजाचे आहेत. सदाभाऊ खोत मराठा समाजाचे तर टिळेकर  माळी समाजाचे आहेत. अमित गोरखे हे पिंपरी-चिंचवडचे भाजप कार्यकर्ते आहेत. खोत, फुके, टिळेकर व गोरखे हे फडणवीस यांचे निकटवर्तीय आहेत.  

अजित पवार गटाकडून गर्जे, विटेकर?अजित पवार गटाला दोन जागा मिळणार असून, त्यासाठी शिवाजी गर्जे (मुंबई) आणि राजेश विटेकर (परभणी) यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याचे समजते. गर्जे यांच्या नावाची शिफारस एकत्रित राष्ट्रवादी असताना राज्यपाल नियुक्त सदस्यपदासाठी झालेली होती. पण, त्या नियुक्त्या होऊ शकल्या नव्हत्या. विटेकर यांनी २०१९ मध्ये परभणीतून राष्ट्रवादीतर्फे लोकसभेची निवडणूक लढविली होती. पण, ते पराभूत झाले होते. 

मविआतर्फे प्रज्ञा सातव, जयंत पाटील काँग्रेसने माजी खासदार दिवंगत राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांना उमेदवारी दिली. या जागेसाठी माजी मंत्री नसीम खान यांच्या नावाचीही चर्चा होती. पण, त्यांना विधानसभेच्या निवडणुकीत उतरविले जाणार आहे. मविआला आणखी एक जागा मिळणार असून, त्यासाठी शेकापचे जयंत पाटील यांना शरद पवार गटाचा पाठिंबा मिळू शकतो. उद्धव सेनेतर्फे मिलिंद नार्वेकर यांचा अर्ज मंगळवारी भरला जाऊ शकतो. तसे झाले तर निवडणूक अटळ असेल.

कुणाला किती मिळणार जागा? : भाजपला (एक मित्रपक्षासह) ५, अजित पवार गटाला २, शिंदे सेनेला २ आणि मविआला २ असे वाटप होईल. शिंदे सेनेने अद्याप उमेदवार जाहीर केलेले नाहीत. 

जानकर राज्यसभेवर? : भाजपतर्फे रासपचे महादेव जानकर यांना विधानपरिषदेवर पाठविणार अशी चर्चा होती. परंतु, जानकर यांना राज्यसभेवर पाठविले जाण्याची शक्यता आहे. त्यांचाही तसाच आग्रह असल्याचे कळते.

टॅग्स :Vidhan Parishadविधान परिषदBJPभाजपाUddhav Thackerayउद्धव ठाकरेMahavikas Aghadiमहाविकास आघाडी