शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
4
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
5
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
6
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
7
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
8
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
9
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
10
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
11
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
12
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
13
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
14
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
15
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
16
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
17
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
18
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
19
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
20
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?

घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2024 06:17 IST

अजित पवार गटाची साथ सोडून नीलेश लंके हे शरद पवार गटात आले. भाजपचे विद्यमान खासदार डॉ. विखे यांच्या विरोधात पवारांनी प्रस्थापित घराण्यांऐवजी लंके यांच्या माध्यमातून सामान्य चेहरा मैदानात उतरविला आहे.

- अण्णा नवथर लोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर: अहमदनगर लोकसभा मतदारसंघात डॉ. सुजय विखे पाटील  आणि पहिल्याच आमदारकीच्या टर्ममध्ये कोविडमधील कामामुळे राज्याला परिचित झालेले नीलेश लंके असा सामना रंगला आहे. वारसा जिंकणार की नवा चेहरा ? याची उत्सुकता या मतदारसंघाला आहे. 

अजित पवार गटाची साथ सोडून नीलेश लंके हे शरद पवार गटात आले. भाजपचे विद्यमान खासदार डॉ. विखे यांच्या विरोधात पवारांनी प्रस्थापित घराण्यांऐवजी लंके यांच्या माध्यमातून सामान्य चेहरा मैदानात उतरविला आहे. डॉ. सुजय हे आपला राजकीय वारसा व आपले शिक्षण प्रचारात सांगत आहेत. तर आपण सामान्य घरातील आहोत व डॉक्टर नसलो तरी कोविडमध्ये जीव धोक्यात घालून लोकांचे प्राण वाचविणारे डॉक्टर आहोत, असा लंके यांचा प्रचार आहे. विखे हे परिवारामुळे लोकप्रिय आहेत;  तेवढीच लोकप्रियता लंके यांचीही आहे. विखेंकडे यंत्रणा आहे. तर लंकेकडे संघटन आहे. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे मतदार संघात मुुलासाठी तळ ठोकून आहेत.

भाजपातील नाराजांची भूमिका काय ?भाजपचे आमदार राम शिंदे यांनी विखे यांच्या कार्यपध्दतीवर नाराजी व्यक्त करत उमेदवारीवर दावा केला होता. तसेच गत विधानसभा निवडणुकीत विखे यांच्यामुळे पराभव झाल्याची तक्रार त्यांच्यासह इतरांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती; मात्र झाले गेले विसरून भाजपतील सर्वचजण विखे यांच्यासाठी कामाला लागले आहेत; परंतु भाजपची एकी मतपेटीत दिसणार का ? ही उत्सुकता आहे. 

गाजत असलेले मुद्दे विखे यांनी इंग्रजी भाषेवरुन केलेले वक्तव्य.   नीलेश लंके यांचे पोलिसांबद्दलचे आक्षेपार्ह वक्तव्य.  खासदार लोकांच्या संपर्कात आहेत का ?

निवडणुकीतील कळीचे मुद्देसाकळाई पाणी योजना, कुकडीचे पाणी, ताजनापूर प्रकल्प जैसे थे.सुपा वगळता एकही एमआयडीसी विकसित नाही, रोजगार देणारे प्रकल्प आणले नाहीत.  शेतमाल, दुधाला भाव देण्यात सरकार अपयशी.मतदारसंघात शासकीय मेडिकल, अभियांत्रिकी महाविद्यालय नाही. नगर-पुणे रेल्वे सेवा प्रलंबितच. 

नेत्यांची भूमिका महत्त्वाची माजी मंत्री बाळासाहेब थोरात, प्राजक्त तनपुरे, रोहित पवार, प्रताप ढाकणे हे नेते उघडपणे लंके यांच्या सोबत आहेत. जिल्ह्यातील अनेक कारखानदार महायुतीसोबत असले तरी आतून काय भूमिका घेतील याचा अंदाज नाही.

टॅग्स :Sujay Vikheसुजय विखेnilesh lankeनिलेश लंकेmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Lok Sabha Election Major Fightsलोकसभा निवडणूक टफ फाइट्स