शिंदे गटातील काही खासदार भाजपच्या तिकिटावर लढणार?; 'या' नेत्याच्या नावाची चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2022 07:16 IST2022-12-09T07:15:35+5:302022-12-09T07:16:05+5:30
भाजपानं मिशन लोकसभा हाती घेतलंय त्यात अनेक मतदारसंघावर भाजपाचा डोळा आहे.

शिंदे गटातील काही खासदार भाजपच्या तिकिटावर लढणार?; 'या' नेत्याच्या नावाची चर्चा
पालघर - पुढील लोकसभा निवडणुकीला अद्याप बराच अवकाश आहे, मात्र सत्ताधारी भाजपने अनेक लोकसभा मतदारसंघांवर लक्ष केंद्रित केले आहे. यात पालघर मतदारसंघाचाही समावेश आहे. पालघरचे खासदार राजेंद्र गावित हे सध्या शिवसेनेचे खासदार असून, ते शिंदे गटात गेलेले आहेत.
गावित यांनी काँग्रेस, भाजप, शिवसेना आणि आता शिंदे गट असा प्रवास केलेला आहे. जिकडे सत्ता तिकडे राजेंद्र गावित असेच जणू समीकरण झालेले आहे. हे पाहता खासदार गावित हे शिंदे गटातून लोकसभेची निवडणूक लढतील की भाजपमधून? याविषयीची सध्या पालघरमध्ये चर्चा रंगताना दिसत आहे. शिंदे गटातील काही खासदार भाजपच्या तिकिटावर लढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यात गावितही असू शकतात, अशीच चर्चा होत आहे.