शरद पवार-अजित पवार एकाच व्यासपीठावर येणार?; नरेंद्र मोदींना पुरस्कार मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2023 05:47 IST2023-07-11T05:46:36+5:302023-07-11T05:47:28+5:30

पंतप्रधान मोदींना टिळक पुरस्कार, पवारांना निमंत्रण

Will Sharad Pawar-Ajit Pawar come on the same platform?; Narendra Modi will get the award | शरद पवार-अजित पवार एकाच व्यासपीठावर येणार?; नरेंद्र मोदींना पुरस्कार मिळणार

शरद पवार-अजित पवार एकाच व्यासपीठावर येणार?; नरेंद्र मोदींना पुरस्कार मिळणार

 पुणे - लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने दिला जाणारा 'लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार' यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला. पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून शरद पवार यांना निमंत्रित केले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार हेदेखील प्रोटोकॉलप्रमाणे यावेळी उपस्थित राहतील. ट्रस्टचे विश्वस्त डॉ. रोहित टिळक यांनी सोमवारी या पुरस्काराची घोषणा केली. लोकमान्य टिळक यांची १०३ वी पुण्यतिथी १ ऑगस्ट २०२३ रोजी आहे. त्यानिमित्त आयोजित सोहळ्यात ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते पंतप्रधान मोदींना गौरविले जाईल. या कार्यक्रमाला राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, ट्रस्टचे विश्वस्त सुशीलकुमार शिंदे उपस्थित राहणार आहेत

Web Title: Will Sharad Pawar-Ajit Pawar come on the same platform?; Narendra Modi will get the award