Rupali Chakankar Latest News: अशोक खरातच्या महिलांवरील लैंगिक अत्याचार प्रकरणाने राजकारण ढवळून निघाले. या प्रकरणात महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना राजीनामा द्यावा लागला. मात्र, त्यांच्या मागील अडचणी संपण्याची चिन्हे नाहीत. उद्धवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आता रुपाली चाकणकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर रुपाली चाकणकर यांनी डोक्यावर असलेल्या अटकेच्या टांगत्या तलवारीकडे लक्ष्य देण्याचा सल्लाही दिला आहे.
सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे की, "दिवंगत लोकनेते अजितदादा पवार यांनी ज्या कष्टाने राष्ट्रवादी काँग्रेस उभा केला आणि महिला मतदारांना आश्वस्त केले त्या महिला मतदारांना जोडून ठेवायचे असेल तर महिला लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली हकालपट्टी झालेल्या चाकणकरांना पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदावरून तात्काळ हटवले पाहिजे. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसला महाराष्ट्रातील महिला मतदारांच्या लोकभावनेचा आदर नाही असे होईल", अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली आहे.
तुमच्या डोक्यावर अटकेची टांगती तलवार
"चाकणकरांनी राजीनाम्यानंतर एक नाट्य रंगवण्याचा प्रयत्न केला होता, तो आम्ही बघितला. मला हसायला आले की, माणसं किती केविलवाणी धडपड करतात. कालची त्यांची धडपड म्हणजे एक प्रयत्न होता आणि त्याने काहीही फरक पडणार नाही. मूळात नोटीस पाठवणं सोडून द्या. तुमच्या डोक्यावर अटकेची टांगती तलवार आहे, त्याचा विचार करा", असा सल्ला सुषमा अंधारेंनी रुपाली चाकणकर यांना दिला.
"तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी माहिती होत्या. तुम्हाला एका वर्षापासून कल्पना होती. तुम्ही पीडितेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. संघटीत गुन्हेगारीचा हा प्रकार होता. त्यामुळे तुमची नार्को टेस्ट झाली पाहिजे आणि तुमची अटक होणं गरजेचं आहे. या मागणीवर मी ठाम आहे", अशी भूमिका अंधारे यांनी मांडली आहे.
सुनेत्रा पवारांकडे चाकणकरांची हकालपट्टी करण्याची मागणी
"सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काल राजीनाम्याचे निर्देश गृहमंत्र्यांनी दिले. खरंतर सुनेत्रा वहिनींनी हस्तक्षेपाची ती वेळच येऊ द्यायला नको होती. सुनेत्रा वहिनांना नेतृत्वातील खमकेपणा दाखवण्याची एक संधी होती. ती संधी त्यांनी दवडली, असो. मात्र आता तरी अजित पवार कधीही गंडे दोरे करणारे नव्हते. अजित पवारांनी कधीही भोंदूगिरीला थारा दिला नाही. असे सगळं करणारी बाई जर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदावर असेल आणि तिच्यामुळे जर पक्षाची बदनामी होत असेल, तर तिला तातडीने प्रदेशाध्यक्ष पदावरून पायउतार केले पाहिजे", अशी मागणीही सुषमा अंधारे यांनी केली आहे.
"असे जर करता येत नसेल, तर आम्ही वारसा जपणारे आहोत, असे सांगू नका. चाकणकर बाई, तुम्हाला काय नोटीसा तुमचा जामीन झाल्यानंतर पाठवा. आधी अटकेच्या टांगत्या तलवारीचा विचार करा. पाच-सातशे कोटी रुपये तुमच्याकडे आहे. तटकरेंचा आशीर्वाद तुमच्यावर आहे. त्यामुळे माझ्यासारख्या चळवळीत माणसाला धमकावण्याचा प्रयत्न कराल, पण अशा धमक्या २५ वर्षांपासून बघतेय", असा खोचक टोला अंधारेंनी लगावला.
Web Summary : Sushma Andhare demands Rupali Chakankar's removal from NCP post after allegations. Andhare advises Chakankar to focus on looming arrest warrant. She emphasizes the need for a narco test and arrest due to alleged involvement in suppressing a victim's voice in a sexual assault case.
Web Summary : सुषमा अंधारे ने रूपाली चाकणकर को आरोपों के बाद एनसीपी पद से हटाने की मांग की। अंधारे ने चाकणकर को गिरफ्तारी वारंट पर ध्यान केंद्रित करने की सलाह दी। उन्होंने यौन उत्पीड़न मामले में पीड़िता की आवाज दबाने में कथित संलिप्तता के कारण नार्को टेस्ट और गिरफ्तारी की आवश्यकता पर बल दिया।