शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी यांचे वाराणसीच्या लोकांसाठी मतदानाच्या आधी खास पत्र, दिला महत्त्वाचा संदेश
2
थोडी जरी नैतिकता असेल तर राजीनामा द्या; रोहित पवारांचा फडणवीस, अजितदादांवर हल्लाबोल
3
केदारनाथ मध्ये मोठा हेलिकॉप्टर अपघात टळला, चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्रवाशांचे प्राण 
4
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
5
शिवसेना-भाजपात वादाची ठिणगी; "आनंदराव अडसूळांनी नको त्या विषयात हात घालू नये, अन्यथा..."
6
राज्यात दुष्काळामुळे स्थिती गंभीर: शरद पवारांनी राज्य सरकारकडे केल्या ७ महत्त्वाच्या मागण्या!
7
पुणे पोर्शे कार अपघात: फडणवीसांनी विरोधकांना सुनावले, “प्रत्येक गोष्टीत राजकारण योग्य नाही”
8
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
9
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
10
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
11
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी
12
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."
13
हातातील बांगड्यांनी उलगडलं गर्भवती युवतीच्या हत्येचं रहस्य; पतीनं रचला होता बनाव
14
चालताना नेमकं काय लक्षात ठेवायचं... वेळ, पावलं की अंतर?; वजन लवकर होईल कमी
15
लैला खान हत्या प्रकरणात सावत्र वडिलांना फाशीची शिक्षा, १३ वर्षांनी अभिनेत्रीला मिळाला न्याय
16
Suresh Raina ने पाकिस्तानी पत्रकाराला झापले, शाहिद आफ्रिदीवरून करत होता ट्रोल 
17
१ वर ३ फ्री शेअर देतेय ही एनर्जी कंपनी, रेकॉर्ड डेट दरम्यान शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या
18
"ब्राह्मण-बनिया समाजातही गरीब लोक, त्यांना आरक्षण मिळू नये का?" मोदींचा काँग्रेसवर घणाघात
19
“याचिकेची वेळ चुकली, आता निवडणुका झाल्यावर सुनावणी”; सुप्रीम कोर्टाचा दिलासा देण्यास नकार
20
Inflation Calculator: २० आणि २५ वर्षांनंतर किती असेल १ कोटी रुपयांचं मूल्य? गणित समूजन करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग

वादाने पुनर्विकास रखडणार?

By admin | Published: September 12, 2014 2:48 AM

गृहनिर्माण व म्हाडाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांतील हेवेदाव्यांमुळे महानगरातील ३००वर सोसायट्यांचा पुनर्विकास अनिश्चित काळासाठी रखडणार

जमीर काझी, मुंबईआचारसंहिता लागू होण्यापूर्वी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णयांचा धडाका लावला असताना गृहनिर्माण व म्हाडाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांतील हेवेदाव्यांमुळे महानगरातील ३००वर सोसायट्यांचा पुनर्विकास अनिश्चित काळासाठी रखडण्याची शक्यता आहे. ‘प्रो-रेटा’मध्ये १५०हून अधिक इमारतींचा पुनर्विकास रखडला आहे. ७५० हून अधिक कुटुंबे बेघराप्रमाणे दिवस काढीत आहेत. सोसायट्यांच्या पुनर्विकासाच्या बदल्यात विकासकांकडून अधिमूल्याऐवजी तयार घरे (हाऊसिंग स्टॉक) २.५ ऐवजी ३ एफएसआय देऊन (प्रीमियम) स्वीकारण्याचा निर्णय नव्या विकास नियमावलीतर्गंत घेतला आहे. डिसेंबर २०१३ पासून सुधारित अध्यादेशाची अंमलबजावणी केली जाणार आहे. मात्र त्यापूर्वी प्रिमियम व हाऊसिंग स्टॉक हे दोन्ही पर्याय उपलब्ध असताना बिल्डरांकडून अधिमूल्य आकारण्याच्या अटीवर पुनर्विकासासाठी ३००वर प्रस्तावांना म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून देकार/ नाहरकत पत्रे दिली आहेत. नवीन नियम त्यांना लागू होत नसतानाही त्यांच्याकडून जादा अधिमूल्य स्वीकारावे किंवा हाऊसिंग स्टॉक सक्तीचे केले जावे, असा विचार म्हाडा व गृहनिर्माण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये आहे. त्याबाबत एकवाक्यता नसल़्याने पुनर्विकास रेंगाळला आहे. मुख्यमंत्र्यांनी याबाबत पूर्वीच्या नियमावलीप्रमाणे निर्णय म्हाडाच्या स्तरावर घ्यावा, नाहक अडथळे निर्माण करु नयेत, अशी सूचना अधिकाऱ्यांना दिली होती. त्यानुसार आॅगस्ट महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात झालेल्या प्राधिकरणाच्या बैठकीत ‘प्रोरेटा’बाबत चर्चा केली. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी या निर्णयाची अंमलबजावणी व्हावी, यासाठी निर्णयावर शिक्कामोर्तब होण्यासाठी म्हाडाच्या उपाध्यक्ष सतीश गवई यांनी स्वाक्षरी करुन गेल्या आठवड्यात हा प्रस्ताव प्राधिकरणाचे सदस्य असलेल्या गृहनिर्माण व नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवाकडे सहमतीसाठी पाठविला. नगरविकास विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी त्यावर स्वाक्षरी केली आहे. मात्र गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव देबशिष चकवर्ती यांनी या प्रस्तावावर आक्षेप घेत अधिक अधिमुल्य आकरण्याची सूचना करीत स्वाक्षरी केली नाही. याबाबत गवई यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध झाले नाहीत. (प्रतिनिधी)