शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

कोणालाही सोडणार नाही, सगळ्यांना ठोकणार; 'खोक्या'वरील कारवाईनंतर मुख्यमंत्र्यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 20:17 IST

कोणाचीही गय केली जाणार नसल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न सरकारकडून करण्यात आल्याचं बोललं जात आहे.

CM Devendra Fadnavis: बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात मारहाण आणि वन्य प्राण्यांची शिकार करत दहशत माजवणाऱ्या सतीश भोसले उर्फ खोक्या या आरोपीला आज पोलिसांनी उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथून ताब्यात घेतलं आहे. तसंच त्याच्या घरावरही प्रशासनाकडून बुलडोजर चालवण्यात आला आहे. या कारवाईविषयी राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य करत आम्ही कोणालाही सोडणार नाही, सगळ्यांना ठोकणार, असं म्हणत चुकीचं काम करणाऱ्या प्रवृत्तींना इशारा दिला आहे.

सतीश भोसले उर्फ खोक्यावर पोलिसांकडून करण्यात आलेल्या कारवाईविषयी पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "बोक्या असो, खोक्या असो नाही तर ठोक्या असो, आम्ही कोणालाही सोडणार नाही. सगळ्यांना ठोकणार."

दरम्यान, सतीश भोसले हा भाजप आमदार सुरेश धस यांचा निकटवर्तीय समजला जातो. याच भोसले याच्यावर कठोर कारवाई करत कोणाचीही गय केली जाणार नसल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न सरकारकडून करण्यात आल्याचं बोललं जात आहे.

उत्तर प्रदेशात आवळल्या खोक्याचा मुसक्या

सतीश ऊर्फ खोक्या भोसले याच्याविरोधात चार गंभीर गुन्हे दाखल होते. तो सहा दिवसांपासून फरार होता. छत्रपती संभाजीनगरहून तो ट्रॅव्हल्सने प्रयागराजला (उत्तर प्रदेश) गेला. तेथे लपण्याआधीच बीड पोलिसांनी उत्तर प्रदेश पोलिसांच्या मदतीने त्याला बेड्या ठोकल्या. शुक्रवारी सकाळी त्याला बंदोबस्तात बीडला आणले जाणार आहे. घरावर बुलडोजर

भाजपचा कार्यकर्ता खोक्या उर्फ सतीश भोसले याच्या घरावर आज वनविभागाने बुलडोजर चालवला. शिरूर कासार शहरापासून काही अंतरावर वनविभागाची जमीन आहे. याच जमिनीवर वैदू वस्ती वसलेली होती. तिथे सतीश भोसलेने घर बांधलेलं होतं. ग्लास हाऊस असे या घराचं नाव होतं, हे घर अनधिकृत असल्याने वनविभागाने गुरूवारी बुलडोजरने जमीनदोस्त केले. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBeed Crimeबीड क्राईम मराठी बातम्याPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीBeedबीड