शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Exclusive : नारायण राणेंची महाराष्ट्रातील जागा समजेल; नितेश राणेंचा सूचक इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2019 18:55 IST

शिवसेना काँग्रेसने त्यांच्या फायद्यासाठी राणेंचा वापर केला.

मुंबई : महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या स्थापनेनंतर ही पक्षाची पहिली लोकसभा निवडणूक आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात नारायण राणेंची जागा काय आहे, हे आम्हाला आणि इतरांनाही कळेल. शिवसेना काँग्रेसने त्यांच्या फायद्यासाठी राणेंचा वापर केला. आता राणे त्यांचा पक्ष वाढविणार, असा इशारा आमदार नितेश राणे यांनी दिला. 

स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे यांची मुलाखत लोकमतचे राजकीय संपादक राजा माने यांनी घेतली. यावेळी नितेश राणे यांनी नारायण राणे यांची लोकसभेसाठीची भुमिका स्पष्ट केली. 

देश महासत्ता बनण्यासाठी जो प्रयत्न करतोय त्यासाठी ही लोकसभा निवडणूक महत्वाची आहे. आपल्या देशातील तरुणाईची संख्या जपान, चीनच्या तुलनेत जास्त आहे आणि वाढत जाईल. त्यांची स्वप्ने कशी पूर्ण होतील याकडे ही निवडणूक जाणार असल्याचे सांगतानाच त्यांनी स्वाभिमान पक्षाच्या स्थापनेनंतर ही पहिली लोकसभा निवडणूक आहे. आमच्यासाठी राजकीय दृष्टीकोणातून आणि राज्याच्या राजकारणात आमची जागा काय असेल हे दाखविण्यासाठी ही निवडणूक महत्वाची असल्याचे सांगितले. 

लोकसभेनंतर राणे पिता-पूत्र एकाच झेंड्याखालीयानंतर मुलगा काँग्रेसचा आमदार, स्वत: भाजपच्या तिकिटावर नारायण राणे खासदार यामुळे तुम्हाला महाराष्ट्राने का स्वीकारावे असा प्रश्न नितेश राणें यांना विचारला असता त्यांनी राणेंना हा निर्णय का घ्यावा लागला हे पटवून देऊ, असे सांगितले. राणेंनी ते सर्व मांडलेलेही आहे. काँग्रेसने राणेंना कोणती आश्वासने दिली होती, किती पाळली ते लोकांनाही माहित आहे. लोकसभा, विधानसभेच्या निवडणुकीनंतर आम्ही सर्वजण एका छत्रीखाली, एकाच पक्षाच्या झेंड्याखाली दिसू, त्यानंतर तुम्हाला हा प्रश्न विचारावा लागणार नाही. अडचणी असल्याने काँग्रेसमध्ये मी सध्या तांत्रिकदृष्य्ट्या आहे. राणे लपूनछपून बोलणारा नाही. ते स्पष्ट बोलतात. यामुळे जनता समजून जाईल, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. 

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे Narayan Raneनारायण राणे BJPभाजपाcongressकाँग्रेस