शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
3
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
4
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
5
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
6
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
7
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
8
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
9
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
10
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
11
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
12
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
13
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
14
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
15
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
16
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
17
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
18
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
19
उपनगरांतील मतदार दिलदार, शहरात कंजुषी; मुंबईतील सर्व मतदारसंघांचे आकडे काय सांगतात...
20
दौडा दौडा... भागा भागा सा... प्रचार करताना दमछाक

...तर राजकारण सोडून देईन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 5:35 AM

जितेंद्र आव्हाड : संघाला कायद्याच्या चौकटीत आणण्याचा मसुदा आंबेडकरांनी द्यावा; त्यावर आघाडीच्या नेत्यांच्या सह्या मी घेतो

मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला कायद्याच्या चौकटीत कसे आणायचे, याबाबतचा मसुदा प्रकाश आंबेडकर यांनी द्यावा. त्यावर महाराष्ट्रातील आघाडीच्या सर्व नेत्यांच्या सह्या आणण्याची जबाबदारी मी घेतो. तुम्ही दिलेल्या मसुद्यावर जर सह्या झाल्या नाहीत तर मी राजकारण सोडून देईन, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी रविवारी दिला.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीने संघाला कायद्याच्या चौकटीत बसविण्याचे लेखी आश्वासन दिल्यास आपण महाआघाडीत सामील होऊ. त्यासाठी लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत वाट पाहण्याची आपली तयारी असल्याचे विधान भारिप बहुजन संघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी शिवाजी पार्कवरील सभेत बोलताना केले होते. यावर प्रतिक्रिया देताना आव्हाड म्हणाले की, भाजपाविरोधात महाआघाडी व्हायला हवी. प्रकाश आंबेडकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहेत. त्यांनीच आता संघाला कायद्याच्या, संविधानाच्या चौकटीत बसविण्याचा मसुदा तयार करावा.

या मसुद्यावर राज्यातील आघाडीच्या सर्व नेत्यांच्या सह्या आणण्याची जबाबदारी मी घेतो. परंतु आघाडीत बिघाडी होईल अशी भूमिका घेऊ नये, असे आव्हाड म्हणाले. ओवेसींचे आकर्षण संपले!भारिप आणि एमआयएमच्या आघाडीबाबत आव्हाड म्हणाले की, शिवाजी पार्क येथील वंचित बहुजन आघाडीच्या मेळाव्यात मुस्लीम समाज नव्हता. मुस्लीम समाजाची अनुपस्थिती म्हणजे असदुद्दीन ओवेसी यांचे आकर्षण संपल्याचे निदर्शक आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी याचा पुन्हा एकदा विचार करावा आणि भाजपाविरोधात महाआघाडीत सामील व्हावे, असे आवाहनही आव्हाड यांनी केले.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर