‘माजी सैनिक सोनू महाजन यांना संरक्षणमंत्री फोन करणार का?’

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2020 03:03 IST2020-09-14T03:03:28+5:302020-09-14T03:03:47+5:30

किमान आता तरी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह सोनू महाजनांना फोन करणार का, असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.

"Will the Defense Minister call ex-serviceman Sonu Mahajan?" | ‘माजी सैनिक सोनू महाजन यांना संरक्षणमंत्री फोन करणार का?’

‘माजी सैनिक सोनू महाजन यांना संरक्षणमंत्री फोन करणार का?’

मुंबई : मुंबईतील निवृत्त नौदल अधिकाऱ्याला झालेल्या मारहाणीवरून आकांडतांडव करणा-या भाजपला सैनिकांबद्दल फारच आदर असता तर जळगावमधील माजी सैनिक सोनू महाजन यांना न्यायासाठी चार वर्षांपासून भटकावे लागले नसते. त्यांच्यावर २०१६ साली हल्ला करण्यात आला. तीन वर्षे साधा एफआयआरही दाखल केला नाही. किमान आता तरी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह सोनू महाजनांना फोन करणार का, असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.
सावंत म्हणाले की, महाजन यांच्यावर २०१६ साली भाजपचे आमदार उन्मेष पाटील जे आता खासदार आहेत त्यांच्या आदेशावरून हल्ला करण्यात आला. राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे सरकार होते.

भाजपचे देशप्रेम, सैनिकांबद्दलचा आदर हे त्यांचेच आमदार प्रशांत परिचारक यांचे सैनिकांबद्दलचे वक्तव्य, जळगावचे महाजन मारहाण प्रकरण यावरून दिसून आले आहे. महाविकास आघाडीकडून पाठपुरावा करून महाजन यांना न्याय देण्याचा प्रयत्न करु, असेही सावंत म्हणाले.

Web Title: "Will the Defense Minister call ex-serviceman Sonu Mahajan?"