नारायण राणेंसाठी गड्या मुंबै बरी...
अस्सल कोकणी नेते माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे हे गड्या आपला गाव बरा... या उक्तीला अपवाद कसे असतील? परंतु सध्या सिंधुदुर्गात नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत भाजपचे नितेश राणे आणि शिंदेसेनेचे नीलेश राणे यांच्यान घमासान सुरू आहे. नीलेश राणे स्टिंग ऑपरेशन करतायत आणि नितेश राणे त्या आरोपांचा मुकाबला करतायत. आपलेच दोन पुत्र महायुतीमधील दोन पक्षांतून परस्पर विरोधात उभे ठाकू नये याकरिता सिंधुदुर्गात युती करावी याकरिता नारायण राणे आग्रही होते. मात्र भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांन स्वबळाचा नारा दिल्याने राणेंच्या घरात राजकीय शिमगा सुरू झाला. त्यामुळे नारायण राणे यांनी बॅगा बांधून मुंबई गाठलीय. आता निकालाच्या दिवशीच ते गावी जाणा त्यामुळे तूर्त तरी राणे 'गड्या आपली मुंबै बरी', असे भेटेल त्याला सांगतायत.
दत्तजयंतीनंतर होणार निर्णय
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बदलापूरला निवडणूक प्रचारसभेला आले असताना माजी आ. सुभाष भोईर यांनी त्यांची भेट घेतली. त्या भेटीचे फोटो व्हायरल झाले. गेल्या काही दिवसांपासून भोईर हे फडणवीस यांच्या संपर्कात आहेत. निवडणूक धामधुमीत त्यांनी घेतलेल्या भेटीमुळे भोईर पुन्हा चर्चेत आले असून लवकरच ते उद्धवसेना सोडतील, अशी चर्चा त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरू झाली. भोईर हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळचे असले तरी गेल्या काही वर्षांपासून त्यांच्यात अबोला असून भाजपशी जवळीक वाढली आहे. दत्तजयंतीनंतर त्यांचा निर्णय ते जाहीर करतील, अशी राजकीय गोटात चर्चा सुरू आहे.
रेल्वे प्रवाशांचा विसर का पडला?
रेल्वे सल्लागार समितीच्या सदस्यांची रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबत अलीकडेच एक बैठक झाली. यावेळी खा. संजय पाटील, खा. नरेश म्हस्के, खा. बाळ्यामामा म्हात्रे यांनी त्यांच्या मतदारसंघातील प्रवाशांचे प्रश्न मांडले. त्याबाबत त्यांनी माध्यमांना माहितीही दिली. कळवा-अंबरनाथ या रेल्वे मार्गावरील प्रवाशांच्या समस्या गंभीर आहेत. कल्याण मतदारसंघाचे खा. डॉ. श्रीकांत शिंदे या महत्त्वाच्या बैठकीला हजर नसल्याने त्यांच्या मतदारसंघातील प्रवाशांच्या समस्यांवर चर्चा झाली नाही. नगरपालिका, नगरपरिषद निवडणुकीत शिंदेसेनेच्या प्रचाराची थुरा त्यांच्या खांद्यावर आहे. त्यामुळे ते उपस्थित नसावेत. पण, रेल्वे प्रवाशांच्या प्रश्नांसाठी त्यांच्याकडे वेळ नाही, असा तर्क कोणी लढवला तर नवल काय?
मतदान दुसऱ्यांना, निवेदन आपल्याला
सुधीर मुनगंटीवार आणि सामान्य नागरिकांचे नाते घट्ट असल्याने अनेकजण त्यांच्याकडे हक्काने निवेदन देतात. पण, त्यानंतरही लोकसभेत त्यांचा पराभव झाला. आता ते मंत्रीही नाहीत. त्यानंतरही त्यांच्याकडे गेलेल्या नागरिकांच्या निवेदनावर त्वरित शेरा मारून कामे मार्गी लावण्याची त्यांची शैली आहे. याच कारणामुळे त्यांच्याकडे निवेदनांचा पाऊस असतो. सध्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रचारादरम्यान मुनगंटीवार यांनी मतदारांनाही पराभवाची आठवण करून दिली. 'मतदान दुसऱ्यांना करता आणि काम करून देण्यासाठी निवेदन आम्हाला देता', हे कसे चालणार, असे ते म्हणाले. त्यांच्या व्यक्तव्यामुळे ते यापुढे आपले काम करणार की नाही, असा प्रश्न त्यांच्या कट्टर समर्थकांसह सर्वसामान्यांना पडला असेल ना?
Web Summary : Political shifts dominate Maharashtra: Narayan Rane focuses on Mumbai amid local elections. Ex-MLA Subhash Bhoir considers joining BJP after meeting Fadnavis. Railway issues remain unaddressed. Munugantiwar questions voters seeking help after voting for others.
Web Summary : महाराष्ट्र में राजनीतिक बदलाव: नारायण राणे स्थानीय चुनावों के बीच मुंबई पर ध्यान केंद्रित कर रहे हैं। पूर्व विधायक सुभाष भोईर फडणवीस से मिलने के बाद भाजपा में शामिल होने पर विचार कर रहे हैं। रेलवे के मुद्दे अनसुलझे हैं। मुनगंटीवार ने दूसरों को वोट देने के बाद मदद मांगने वाले मतदाताओं पर सवाल उठाया।