"ज्यावेळी विमान अपघात झाला, त्यावेळी विमानात अजित पवारांचा पीए का नव्हता? मी संशय व्यक्त केला आहे, आरोप केलेला नाही. याची चौकशी व्हायला हवी. मी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनाही भेटणार आहे. अजित पवार माझ्या जिल्ह्याचे पालकमंत्री होते", अशी नवीन शंका उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) खासदार बजरंग सोनावणे यांनी चौकशीची मागणी केली आहे.
"विमानात अजित पवारांसोबत पीए का नव्हता? मी समोरासमोर जाऊन बोलणारा माणूस आहे. नेहमी सोबत असणारे पीए त्यादिवशी कुठे गेले होते? त्या दिवशी फक्त सुरक्षारक्षकच सोबत होते. मी फक्त संशय व्यक्त केला आहे. याबाबत मी संसदेत प्रश्न उपस्थित करणार आहे. मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला पाहिजे", अशी भूमिका खासदार बजरंग सोनवणे यांनी मांडली.
अमोल मिटकरींच्या प्रश्नांवर काय म्हणाले?
"प्रत्येकाच्या मनामध्ये इच्छा आहे की, चौकशी झाली पाहिजे. यामध्ये राजकारण कोणीही करत नाही, असं मला वाटत आहे. संशय व्यक्त करणे यात गैर काय? आता याबाबत सीआयडीकडे देखील तपास दिलेला आहे. आम्ही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना देखील याबाबत भेटू", असे खासदार सोनवणे मिटकरींकडून उपस्थित केल्या जात असलेल्या मुद्द्यांबद्दल म्हणाले.
विलिनीकरणाचे काय होणार?
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या मुद्द्यावर खासदार सोनवणे म्हणाले, "याबाबत अजित पवारांनी सुनील तटकरे यांच्याशी चर्चा केली नसेल, याबाबत मी कसं काय सांगू? कुणी काय बोलावं ह्या ज्याचा त्याचा प्रश्न आहे, मी काय बोलावं हा माझा अधिकार आहे. विलीनीकरण हे शरद पवारांच्या अखात्यारीत आहे. याबाबत मी उत्तर देऊ शकत नाही", अशी भूमिका त्यांनी मांडली.
Web Summary : NCP MP Bajrang Sonawane raises doubts about Ajit Pawar's PA's absence during a plane incident, demanding an inquiry. He plans to meet the Chief Minister and Home Minister, expressing suspicion and intending to raise the issue in Parliament. He also commented on party merger possibilities.
Web Summary : राकांपा सांसद बजरंग सोनावणे ने अजित पवार के पीए की विमान हादसे के दौरान अनुपस्थिति पर संदेह जताया और जांच की मांग की। उन्होंने मुख्यमंत्री और गृह मंत्री से मिलने की योजना बनाई है, संदेह व्यक्त किया है और संसद में इस मुद्दे को उठाने का इरादा जताया है। उन्होंने पार्टी विलय की संभावनाओं पर भी टिप्पणी की।