प्रमोद महाजन यांची हत्या का झाली? १९ वर्षांनंतर भाऊ प्रकाश महाजन यांचा धक्कादायक गौप्यस्फोट, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 13:41 IST2025-10-27T13:40:53+5:302025-10-27T13:41:52+5:30
Pramod Mahajan News: भाजपाचे एकेकाळचे दिग्गज नेते प्रमोद महाजन यांची २००६ साली त्यांचाच भाऊ प्रवीण महाजन याने गोळ्या झाडून हत्या केली होती.तेव्हापासून आतापर्यंत प्रमोद महाजन यांच्या मृत्यूबाबत अनेक उलट सुटल दावे केले जातात. आता प्रमोद महाजन यांचे बंधू प्रकाश महाजन यांनी प्रमोद महाजन यांच्या मृत्यूमागचं कारण सांगताना धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे.

प्रमोद महाजन यांची हत्या का झाली? १९ वर्षांनंतर भाऊ प्रकाश महाजन यांचा धक्कादायक गौप्यस्फोट, म्हणाले...
भाजपाचे एकेकाळचे दिग्गज नेते प्रमोद महाजन यांची २००६ साली त्यांचाच भाऊ प्रवीण महाजन याने गोळ्या झाडून हत्या केली होती. महाजन कुटुंबामध्ये घडलेल्या या घटनेमुळे तेव्हा देशभरात खळबळ उडाली होती. तेव्हापासून आतापर्यंत प्रमोद महाजन यांच्या मृत्यूबाबत अनेक उलट सुटल दावे केले जातात. आता प्रमोद महाजन यांचे बंधू प्रकाश महाजन यांनी प्रमोद महाजन यांच्या मृत्यूमागचं कारण सांगताना धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. प्रमोद महाजन यांची हत्या ही केवळ पैशांच्या हव्यासातून आणि मत्सरामधून झाल्याचा दावा प्रकाश महाजन यांनी केला आहे.
प्रमोद महाजन यांच्या मृत्यूबाबत सनसनाटी दावा करताना प्रकाश महाजन म्हणाले की, काही न करता सुखाला चलावलेला माणूसच असं करू शकतो. प्रमोद महाजन यांना त्रास देणं, ब्लॅकमेल करणं ही कामं प्रवीण महाजन हा करत होता. तो प्रमोद महाजन यांना पैशांसाठी ब्लॅकमेल करत होता. तसेच ज्या व्यक्तीच्या माध्यमातून हे ब्लॅकमेलिंग चालायचं ती व्यक्ती हयात आहे. त्यामुळे मी त्या व्यक्तीचं नाव घेणार नाही. प्रमोद महाजन यांची हत्या ही केवळ पैशांच्या हव्यासातून आणि मत्सरामधून झाली, असे प्रकाश महाजन यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, प्रवीण महाजन याने प्रमोद महाजन यांचं जीवन उद्ध्वस्त केलं. प्रवीण महाजन हा प्रमोद महाजन यांना सातत्याने ब्लॅकमेल करत होता. प्रमोद महाजन यांना मी चांगलं म्हणत नाही. त्यांच्याकडूनाही काही चुका झाल्या असतील. ते राक्षसही असतील, मात्र त्यांना गोळ्या घालण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला होता, असा सवाल प्रकाश महाजन यांनी उपस्थित केला. प्रवीण महाजन हा पैशांना चलावलेला होता. तो काही काम करत नव्हता. नोकरीवर जायचं नाही. सारखी पगारवाढ मागायची. पैसे मागायचे, असले उद्योग तो करायचा, असा गौप्यस्फोटही प्रकाश महाजन यांनी केला.
दरम्यान, पंकजा मुंडे यांचा बिघडलेली मुलगी असा उल्लेख करणाऱ्या सारंगी महाजन यांच्यावरही प्रकाश महाजन यांनी टीका केली. असं बोलताना लाज वाटत नाही का, असा सवाल प्रकाश महाजन यांनी विचारला. तसेच गोपिनाथ मुंडे यांनी प्रवीण महाजनविरोधात साक्ष दिल्याने सारंगी महाजन असं बोलत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.