'Why do police salaries account at Axis Bank?' | 'पोलिसांच्या वेतनाची खाती अ‍ॅक्सिस बँकेत का?'
'पोलिसांच्या वेतनाची खाती अ‍ॅक्सिस बँकेत का?'

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांच्या पगाराची खाती अक्सिस बँकेत वर्ग केल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या प्रचारसमितीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला.

विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना २००५ सालीच पोलिसांची पगाराची खाती अ‍ॅक्सिस वर्ग करण्याचा निर्णय घेतला होता, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला आहे. मात्र हा दावा खोटा असल्याचे सांगून देशमुख यांच्या काळात पोलिसांची पगार खाती वर्ग करण्यासंदर्भात काढलेल्या शासन निर्णयामध्ये वेगवेगळ्या १५ बँकांची नावे होती. मात्र २०१७ मध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आदेशाने पोलीस मुख्यालयातून एक परिपत्रक काढण्यात आले आणि पोलिसांचे पगार अ‍ॅक्सिस बँकेतून करण्याचा निर्णय झाला. याविरोधात मुंबईच्या उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात एक याचिका दाखल करण्यात आली होती. तिचे जनहित याचिकेमध्ये रूपांतर करून घेतल्याचे पटोले यांनी सांगितले.

जनहित याचिका
प्रकरणातील गडबड व गांभीर्य लक्षात आल्याने उच्च न्यायालयाने त्याचे जनहित याचिकेमध्ये रूपांतर केले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देऊन चौकशीला सामोरे जावे, अशी मागणी पटोले यांनी केली आहे.

Web Title: 'Why do police salaries account at Axis Bank?'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.