शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
2
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
3
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
4
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
5
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
6
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
8
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
9
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
10
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
11
महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचा फोटो काढून जिंकू शकता ५ लाख ! कुठे करायचा अपलोड, काय आहे योजना?
12
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
13
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  
14
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
15
वडिलांना आणि भावाला अडकण्यासाठी मुलीने रचला भयानक कट; बॉयफ्रेंडच्या मित्राची हत्या केली अन्...
16
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले
17
PAK vs SL : 'डबल पंजा पॅटर्न'मुळे लंकेचा पेपर सोपा! पाकला मात्र नापास होण्याचा धोका!
18
भरधाव ट्रकमागे दुचाकीस्वाराचा थरार, जीवघेणा स्टंट पाहून तुमच्याही अंगावर येईल शहारा! VIDEO व्हायरल
19
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
20
सूर्य नक्षत्र परिवर्तन २०२५: २७ सप्टेंबरला सूर्य बदलणार नक्षत्र आणि 'या' ७ राशींचे भाग्य; बाकी राशींचे काय?

आमने-सामने : राजकारणात पुन्हा हिंदुत्वाचा मुद्दा आताच का आला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2022 12:26 IST

हिंदुत्वाच्या मुद्दयांवर भ्रम निर्माण केला जातो आहे. म्हणून उद्धव ठाकरे यांनी अतिशय चांगला शब्द वापरला तो म्हणजे नवहिंदुत्ववादी.

शिवसेनेचे बंडखाेर नेते एकनाथ शिंदे व त्यांच्यासाेबतच्या आमदारांनी हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यावरून राजकारण तापले आहे. 

अरविंद सावंत, खासदार, शिवसेना -बंडखोरांकडे कोणताही मुद्दा शिल्लक राहिला नाही म्हणून हिंदुत्वाचा मुद्दा आता आला. त्यातून महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी आली म्हणून डिवचण्यासाठी हे सुरू आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर ते दुसरा कोणताही आरोप करू शकत नाहीत. कारण ते सृजनशील, सौजन्यशील आणि सज्जन आहेत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी उद्धव ठाकरे बसले. त्यानंतर त्या माणसाने कोरोनाकाळात फोकस करून नागरिकांचे प्राण वाचविले. तुम्ही त्यांच्यावर टीका करणार. बंडखोरांच्या हाती मुद्दा नाही म्हणून भ्रम निर्माण केले जात आहेत. 

हिंदुत्वाच्या मुद्दयांवर भ्रम निर्माण केला जातो आहे. म्हणून उद्धव ठाकरे यांनी अतिशय चांगला शब्द वापरला तो म्हणजे नवहिंदुत्ववादी. बंडखोरांचा हा हिंदुत्ववाद नाही. कारण हिंदुत्ववादात द्वेष नाही; राष्ट्र आहे. राष्ट्रप्रेम आहे. त्या राष्ट्रामध्ये राष्ट्रातील माणसांबद्दलचे प्रेम आहे. सगळ्यांना एका धाग्यात ओवण्यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्व आणले. हिंदुत्वाचे राजकीय जनक कोण असतील तर ते बाळासाहेब ठाकरे आहेत. त्यांनी कुणाचा द्वेष नाही सांगितला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेला अनुसरून उद्धव ठाकरे काम करत राहिले. हिंदुत्वाची भूमिका असेल तर ज्या हिंदुत्वाचा नुसता स्वीकार नाही तर ज्यांनी हिंदुत्व अंगीकारले अशा शिवसेनेचे खच्चीकरण केले जात आहे. 

अतुल भातखळकर, आमदार, भाजप सध्या शिवसेनेत जे काही चालू आहे, हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. त्याच्याशी भाजपचा कसलाच संबंध नाही; पण सध्या शिवसेनेच्या ४२ आमदारांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांच्याबरोबरचे मतभेद प्रकट केले आहेत. आतापर्यंत हिंदुत्वाच्या आधारे शिवसेनेची वाटचाल झाली होती; परंतु उद्धव ठाकरे यांनी जनमताचा विश्वासघात करून काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आघाडी करून मुख्यमंत्रिपद मिळविले, तेव्हाच हिंदुत्वासोबत प्रतारणा झाली होती. काँग्रेसच्या मुखपत्रात स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी केली जाते. 

उद्धव ठाकरे ते सत्तेसाठी सहन करतात. याउलट मणीशंकर अय्यर यांनी अंदमानातील सावरकरांच्या ओळी हटविल्या. तेव्हा त्या वयात बाळासाहेब ठाकरे बाहेर पडले आणि आंदोलनात सामील होत अय्यर यांच्या पुतळ्याला जोडे मारले. त्याच्या टोकाचा उलट व्यवहार उद्धव ठाकरे करत आहेत. भाजपने कधीच हिंदुत्वापासून फारकत घेतली नाही. तरीही भाजपलाच उलटसुलट प्रश्न करण्याचेच धोरण राबविले गेले; पण हे करताना स्वत:चा हिंदुत्वाचा वारसा आहे, त्याविरोधात वागतोय, याची तमा त्यांनी बाळगली नाही. एकीकडे शरद पवार आणि काँग्रेस आपली लांगूलचालनवादी धोरणे राबवत असताना उद्धव ठाकरे मात्र हिंदुत्वापासून फारकत घेत असल्याचे जनतेने पाहिले. त्यामुळे परंपरागत हिंदुत्ववादी कार्यकर्ते, सामान्य नागरिक दुरावणे सहज दिसत होते.  

टॅग्स :Atul Bhatkalkarअतुल भातखळकरArvind Sawantअरविंद सावंतShiv Senaशिवसेना