Why did the Prime Minister and Chief Minister not get vaccinated? Asked Prakash Ambedkar | ‘पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांनी काेविड लस का घेतली नाही?’, प्रकाश आंबेडकरांचा सवाल

‘पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांनी काेविड लस का घेतली नाही?’, प्रकाश आंबेडकरांचा सवाल


अकाेला : कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरणाची मोहीम सुरू करण्यात आली आहे. फ्रंटलाइन काेराेनायाेद्ध्यांसाठी पहिल्या टप्प्यात हे लसीकरण 
होत आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दोघेही काेराेनायाेद्धा असतानाही त्यांनी लस का घेतली नाही, असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे.
 
ते म्हणाले की, आजवर लसीकरणाचे अनेक टप्पे मी पाहिले आहेत. यापूर्वी लसीकरण झाले त्यामध्ये पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांनी आधी लस घेतली असून, लोकांना विश्वास दिला हाेता. आता मात्र  केवळ ढाेल वाजविण्याचे प्रकार सुरू आहेत. ज्याप्रमाणे जुन्या काळात राजा शिकारीला जात असे तेव्हा ढाेल वाजविले जात हाेते.  तसाच प्रकार आता सुरू आहे. लससंदर्भात अनेक शास्त्रज्ञांमध्ये मतभेद आहेत.  

तात्पुरते कर्मचारी... 
- काेराेना काळात रुग्णांना डाॅक्टर हातही लावायला तयार नव्हते तेव्हा तात्पुरत्या स्वरूपात नेमलेल्या कर्मचाऱ्यांनी माेलाची साथ दिली. 
- आता त्यांना कमी करण्याचे राज्य सरकारचे धोरण असंवेदनशीलतेचे आहे, असे ॲड. आंबेडकर यांनी सांगितले. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Why did the Prime Minister and Chief Minister not get vaccinated? Asked Prakash Ambedkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.