मराठा नेत्यांनो गप्प का? त्यांच्याकडे २० टक्के, आमच्याकडे ८० टक्के मते; भुजबळांची जरांगेंवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2023 18:26 IST2023-12-09T18:25:39+5:302023-12-09T18:26:18+5:30
पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात ओबीसी मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी भुजबळांनी मराठा नेत्यांना कशाला घाबरताय असा सवाल करत मनोज जरांगे पाटलांना लक्ष्य केले आहे.

मराठा नेत्यांनो गप्प का? त्यांच्याकडे २० टक्के, आमच्याकडे ८० टक्के मते; भुजबळांची जरांगेंवर टीका
राज्यात अशांतता कोण पसरवतेय? ते रोज सभा घेतायत मी १५ दिवसांनी घेतोय. मनोज जरांगे यांनी आमदार नारायण कुचे यांच्या शारीरिक व्यंगावर टीका केली. कुणाच्या शारीरिक व्यंगावर टीका करणे चुकीचे आहे. आपण अशांना दिव्यांग म्हणतो. हिंदीतून टीका केली, तू दिव्यांग झालाय, तुला हिंदीसुद्धा येत नाही, अशी टीका मंत्री छगन भुजबळ यांनी जरांगे पाटलांवर केली आहे.
पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात ओबीसी मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी भुजबळांनी मराठा नेत्यांना कशाला घाबरताय असा सवाल करत मनोज जरांगे पाटलांना लक्ष्य केले आहे.
मी 15 दिवसांनी बोलतो. पण एक आहे. सौ सोनार की और एक लोहार की. त्यामुळे थोडे बोलावे लागते. सर्वच काही ऐकून घेण्याची सवय आमच्यापैकी कुणालाच नाही. छगन भुजबळला सुद्धा ऐकायची सवय नाही. राज्याच शांतता असेल तर उद्योगधंदे येतील. बेरोजगारी दूर होईल. राज्याची आर्थिक स्वयत्ता वाढेल. परंतू, राज्यात अशांतता कोण निर्माण करतेय हे पाहणे आवश्यक आहे, अशी टीका भुजबळ यांनी केली.
बीडमध्ये आमदारांच्या घरावर हल्ले झाले, बायका-मुली कशातरी वाचल्या. क्षीरसागर कुटुंबियांना मुसलमान समाजाने वाचवले. आपल्याच स्वकियांवर, बायका-मुलांवर हल्ला करा? छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना हे शिकवले का? असा सवालही भुजबळ यांनी जरांगे यांना केला.
या महाराष्ट्रात विचार करणारा मराठा समाजही आहे. पण तो बोलत का नाहीय. मोठे नेते देखील आहेत, त्यांना कसली भीती वाटतेय? निवडणुकीच्या मतांची का? अरे त्यांच्याकडे २० टक्के आहेत, आमच्याकडे ८० टक्के मते आहेत. हर्षवर्धन पाटील कुणबी प्रमाणपत्र हवेय का? मोहिते पाटील कुणबी प्रमाणपत्र हवेय का? पाहिजे तर बोला, नको तर नको असे बोला, अरे बोला ना... सगळे शांत बसले कारण निवडणुकीसाठी? या गोष्टींना आळा घालणार नाहीत का, असा सवालही भुजबळ यांनी केला.