नियम फक्त सामान्य नागरिकांसाठीच का?; मनसे आमदार राजू पाटील यांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2021 20:37 IST2021-03-26T20:36:18+5:302021-03-26T20:37:32+5:30
वडवली रेल्वे उड्डाण पूलाचे लोकार्पण शनिवारी सायंकाळी पाच वाजता एकनाथ शिंदेंच्या हस्ते होणार लोकार्पण

नियम फक्त सामान्य नागरिकांसाठीच का?; मनसे आमदार राजू पाटील यांचा सवाल
कल्याण-कल्याण डोंबिवली महापालिकेने कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना महापालिकेने सामान्य नागरीकांवर विविध निर्बंध घातले आहेत. मात्र नियम फक्त सामन्यांनाच का? असा सवाल मनसेचे आमदार राजू पाटील यांनी उपस्थित केला आहे.
"वडवली रेल्वे उड्डाण पूलाचे लोकार्पण शनिवारी सायंकाळी पाच वाजता पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. हा सार्वजनिक कार्यक्रम आहे. नागरिकांना बंदी घातली जात असताना सार्वजनिक कार्यक्रमांना कशाच्या आधारे परवानगी दिली गेली आहे. पालिकेसाठी वेगळे नियम आहेत का?," असा सवाल मनसे आमदार राजू पाटील यांनी उपस्थित केला आहे.
मा.आयुक्त @KDMCOfficial ,
— Raju Patil (@rajupatilmanase) March 26, 2021
सार्वजनिक कार्यक्रमांना परवानगी असणार नाही असे आपणच म्हणता आहात,मग पालिकेसाठी वेगळे नियम आहेत का ? १२ वर्ष रखडलेल्या पुलाच्या चांगल्या वाईटाचे श्रेय सत्ताधारी सेनेचेच,पण हा अट्टाहास कशासाठी ? नियम फक्त सामान्य नागरिकांसाठीच आहेत का ?@CMOMaharashtrapic.twitter.com/qgAUm422Fn
११ वर्षे रखडलेल्या वडवली पूलाचे चांगल्या वाईटाचे श्रेय सत्ताधारी शिवसेनेचे आहे. मग कोरोना काळात लोकार्पणाचा अट्टहास कशासाठी असा प्रश्नही पाटील यांनी उपस्थित केला आहे. गुरुवारीच राजू पाटील यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे पाटील यांनी याबाबात कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ट्वीट करत सवाल केले आहेत.