शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

मिनी मंत्रालयांवर कोणाची येणार सत्ता? आज फैसला; ZP निकालाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 06:03 IST

निकालांकडे सत्ताधारी आणि विरोधकांसह राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष, जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांच्या निवडणुकांची मतमोजणी

मुंबई - राज्यातील १२ जिल्हापरिषदा आणि १२५ पंचायत समित्यांसाठी शनिवारी मतदान पार पडल्यानंतर सोमवारी या निवडणुकांची मतमोजणी होणार आहे. सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार असून या निकालांकडे सत्ताधारी आणि विरोधकांसह राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या १२ जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गतच्या १२५ पंचायत समित्यांसाठी मतदान झाले आहे. जिल्हा परिषदेच्या ७३१ जागांसाठी २६२४ उमेदवार रिंगणात असून पंचायत समितीच्या १४६२ जागांसाठी ४८१४ उमेदवार नशिब आजमावत आहेत. या निवडणुकीत ६८.२८ टक्के मतदान झाले. सर्वाधिक मतदान परभणी जिल्ह्यात ७४.८९ टक्के झाले, तर सर्वात कमी मतदान रत्नागिरीत ५५.७९ टक्के इतके झाले. ग्रामीण भागात विकासकामे, पाणीटंचाई, रस्ते, आरोग्य आणि रोजगार हे प्रमुख मुद्दे ठरले, तर राजकीय आघाड्यांमुळे निवडणुकांवर परिणाम झाल्याचे दिसून आले.

मतमोजणीसाठी सर्व तयारी पूर्ण मतमोजणीसाठी प्रशासनाकडून सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र मतमोजणी केंद्रे उभारण्यात आली असून, सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने निकाल जाहीर केले जाणार आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी निवडणूक आयोग आणि जिल्हा प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात आली आहे.

२० जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचे भवितव्य अजूनही अधांतरीज्या जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांपेक्षा जास्त गेली आहे त्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका रखडल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयात यासंदर्भात सुनावणी प्रलंबित आहे. गेल्या महिन्यात निकाल येणे अपेक्षित होते. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निकालाची प्रतीक्षा आहे.  काही दिवसात याचा निकाल आला तरी वार्षिक परीक्षांचा कालावधी लक्षात घेता या निवडणुका लवकर होण्याची शक्यता नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : Zilla Parishad Election Results Today: Political Parties Await Crucial Verdict

Web Summary : Results for 12 Zilla Parishads & 125 Panchayat Samitis are out today. The fate of 731 ZP & 1462 PS candidates will be decided. Key issues included development, water scarcity, roads, & employment. A high voter turnout signals intense political competition.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक २०२६panchayat samitiपंचायत समितीElectionनिवडणूक 2026VotingमतदानBJPभाजपा