शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

WHO म्हणते हे वर्ष जगभरातील नर्सेसला समर्पित

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2020 8:54 PM

जागतिक आराेग्य संघटनेकडून 2020 हे वर्ष नर्सेस, आया यांना समर्पित करण्यात आले आहे.

राहुल गायकवाड पुणे : काेराेनाचा उद्रेक जगभरातील जवळजवळ सर्वच देशांमध्ये झाला आहे. त्याला राेखण्यासाठी सर्वच देशांकडून शर्थिचे प्रयत्न करण्यात येत आहेत. जगभरातील डाॅक्टर या काेराेनाच्या विषाणूशी लढा देत आहेत. या डाॅक्टरांच्याच खांद्याला खांदा लावून परिचारिका, वाॅर्डबाॅय, आया देखील काम करत आहेत. त्यांच्या कार्याला सलाम करण्यासाठी आता जागतिक आराेग्य संघटनेकडून 2020 हे वर्ष परिचारिका तसेच आयांसाठी समर्पित केले आहे. या काळात जगभरातील सर्वच देशांनी त्यांच्यासाठी भरीव तरतूद करण्याचे आवाहन देखील आराेग्य संघटनेकडून करण्यात आले आहे. 

जगभरातील नर्सेस आणि आया रुग्णांच्या सेवेत नेहमीच कटीबद्ध असतात. रुग्णांची सर्व सुश्रुषा त्या करत असतात. तसेच नर्सेस, आया आणि वाॅडबाॅय हे आराेग्य क्षेत्राचा पाठीचा कणा आहेत. त्यामुळे आता जागतिक आराेग्य संघटनेकडून देखील त्यांच्या कामाची दखल घेऊन हे वर्ष त्यांना समर्पित केले आहे. जागतिक आराेग्य संघटना म्हणते, आराेग्य क्षेत्रात नर्सेस, आया आणि वाॅडबाॅय हे महत्त्वाची भूमिका पार पाडतात. ही लाेकं त्यांचे संपूर्ण आयुष्य रुग्णसेवेत तसेच नवजात माता आणि बालकांच्या सेेवेत घालवतात. त्याचबराेबर रुग्णांना वेळेवर औषधे, लसी देणं, त्यांना वैद्यकीय सल्ले देणं त्याचबराेबर ज्येष्ठ नागरिकांवर विशेष लक्ष देणे त्यांच्या आराेग्याची काळजी घेणं अशी कामे ते करत असतात. समाजातील रुग्णांची सेवा करण्यात ते नेहमीच अग्रभागी असतात. जगभरातील नागरिकांचे आराेग्य आबादीत ठेवण्यासाठी आणखी 9 दक्षलक्ष नर्सेस आणि आयांची गरज आहे. त्यामुळेच जागतिक आराेग्य संघटनेकडून 2020 हे वर्षे नर्सेस आणि आया यांना समर्पित करण्यात येत आहे. 

नर्सेस, आया आराेग्य क्षेत्राचा पाठीचा कणा नर्सेस आणि आया ह्या प्रत्येक आराेग्य क्षेत्राचा पाठीचा कणा आहेत. त्यामुळे आम्ही या वर्षी जगभरातील सर्वच देशांना आवाहन करत आहाेत की नर्सेस आणि आयांची आराेग्याबाबतची कटीबद्धता पाहता त्यांच्यासाठी तरदूर करावी - डाॅ. टेडराॅस अधॅनाेम घेब्रॅसस, जागतिक आराेग्य संघटनेचे डिरेक्टर जनरल 

सर्वसामान्यही या उपक्रमात हाेऊ शकतात सहभागी -  नर्सेस, वाॅडबाॅय, आया यांचा जाहीर सत्कार करता येऊ शकताे. -  एखादा साेहळा आयाेजित करुन त्यांना त्याला निमंत्रित करता येऊ शकते. -  विविध सार्वजनिक ठिकाणी या कॅम्पेन बाबतचे पाेस्टर लावू शकता.-  सेलेब्रिटी, लीटर यांना सांगून त्यांच्या भाषणांमध्ये, कार्यक्रमांमध्ये या उपक्रमाबाबत उल्लेख करायला सांगू शकता.

टॅग्स :World health organisationजागतिक आरोग्य संघटनाHealthआरोग्यPuneपुणे