शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाले...
2
Maharashtra Politics :'उद्धव ठाकरे युतीसाठी कमालीचे सकारात्मक, कटुता नाही'; संजय राऊतांनी एकत्र येण्याबाबत पुन्हा दिले संकेत
3
छत्रपती संभाजीनगरात खंडपीठाला बॉम्बने उडवण्याची धमकी; कोर्टात शोध मोहीम, पोलिस अलर्ट
4
'पाच दिवसांत व्हिडीओ काढून टाका...', दिल्ली उच्च न्यायालयाचा रामदेव बाबांना दणका
5
पुन्हा परतला कोरोना, महाराष्ट्राशेजारील या राज्यात एका महिलेच्या मृत्यूने खळबळ, सापडले एवढे रुग्ण
6
रस्त्याच्या कामासाठी लावलेलं लोखंडी बॅरिकेड वृद्ध महिलेवर कोसळलं, थरारक व्हिडिओ व्हायरल!  
7
एक बायको गावात, दुसरी शहरात! नववधूची १५ दिवसांत फसवणूक; पतीने गर्लफ्रेंडशी केलं लग्न
8
कामावरून घरी परतला अन् पत्नीचा मृतदेह पाहून हादरला; विक्रोळीतील खळबळजनक घटना
9
"संसद सर्वोच्च आहे, तिच्या वर कोणीही नाही"; टीकेनंतरही उपराष्ट्रपती जगदीप धनखड मतावर ठाम
10
सोन्याची किंमत पहिल्यांदाच १ लाख रुपयांच्या पुढे! तुमच्या शहरात एका तोळ्याचा भाव काय?
11
'हिंदी भाजपची भक्ती नव्हे तर सक्ती', भाजप मनसेमध्ये शिलगला वाद, शिवसेना भवनाच्या अंगणात एकमेकांवर वॉर
12
Chanakyaniti: 'या' तीन गोष्टी कायम गुपित ठेवा, नाहीतर अडचणीत याल!- आचार्य चाणक्य!
13
धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीयाच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू? अंजली दमानियांच्या आरोपाने खळबळ 
14
Karnataka Murder: "मानेची नस कापल्यामुळे कसा होतो मृत्यू?"; माजी डीजीपींच्या हत्येपूर्वी पत्नीने फोनवर केलेलं सर्च
15
"मी सर्व मर्यादा पार केल्या", 'त्या' विधानानंतर अनुराग कश्यपने मागितली ब्राह्मण समाजाची माफी
16
₹१,००० ची म्युच्युअल फंडातील गुंतवणूक बनवू शकते कोट्यधीश, फक्त करावं लागेल 'हे' काम
17
मनी लाँड्रिंग म्हणजे नेमकं काय? अभिनेता महेश बाबू यांच्या प्रकरणातून समजून घ्या; का आली ईडीची नोटीस?
18
जसप्रीत बुमराह आणि स्मृती मानधना ठरले जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटू, मिळाला मोठा सन्मान!
19
Palmistry: तळहाताच्या 'या' उंचवट्यावर तीळ, हे तर राजयोग प्राप्त होण्याचे लक्षण!
20
कर्जाची रक्कम वसूल करण्यासाठी रिकव्हरी एजंट घरी येऊ शकतात का? काय सांगतो कायदा

अंतरवाली सराटी येथील आंदोलकांवर लाठीमाराचे आदेश कुणी दिले होते? RTI मधून महत्त्वाची माहिती समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2023 16:30 IST

Antarwali Sarati: जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू असताना तिथे पोलिसांकडून लाठीमार झाला होता. या लाठीमारानंतर राज्यभरातून जनक्षोभ उसळला होता.

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू असताना तिथे पोलिसांकडून लाठीमार झाला होता. या लाठीमारानंतर राज्यभरातून जनक्षोभ उसळला होता. तसेच या लाठीमारावरून पोलीस अधिकारी आणि  गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती. तसेच लाठीमाराचे आदेश वरून म्हणजेच गृहमंत्रालयातून दिले गेल्याचेही आरोप झाले होते. दरम्यान, याबाबत आरटीआयमधून मागणवण्यात आलेल्या माहितीमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

अंतवाली सराटी येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराचे आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले नव्हते, अशी माहिती आरटीआयमधून समोर आली आहे. जालना जिल्हा जन माहिती माहिती अधिकारी तथा पोलीस उपअधीक्षक (गृह) आर.सी. शेख यांनी ही माहिती दिली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते आसाराम डोंगरे यांनी ही माहिती मागवली होती.

जालना जिल्ह्यातील अंतवारील सराटी येथे मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून बेछूट लाठीमार झाला होता. त्यामध्ये अनेक आंदोलक हे जखमी झाले होते. तसेच या लाठीमारादरम्यान झालेल्या प्रतिकारामध्ये अनेक पोलीसही जखमी झाले होते. या लाठीमारानंतर मराठा आरक्षण आंदोलन अधिकच तीव्र झाले होते. तसेच या लाठीमाराच्या आदेशांसाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दोषी ठरवण्यात येत होते. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनीही घडलेल्या घटनेबाबत दिलगिरी व्यक्त केली होती. दरम्यान, माहितीच्या अधिकारामधून समोर आलेल्या माहितीमुळे देवेंद्र फडणवीस यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtraमहाराष्ट्रPoliceपोलिसRight to Information actमाहिती अधिकार