एकनाथ शिंदे यांची जागा घेणारे अजय चौधरी कोण आहेत? पक्षाकडून मोठी जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2022 16:18 IST2022-06-21T16:18:07+5:302022-06-21T16:18:16+5:30

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि राज्य सरकारमधील नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेसह राज्यातील राजकारणामध्ये खळबळ उडाली आहे.

Who is Ajay Chaudhary who replaced Eknath Shinde? big responsibility from the party | एकनाथ शिंदे यांची जागा घेणारे अजय चौधरी कोण आहेत? पक्षाकडून मोठी जबाबदारी

एकनाथ शिंदे यांची जागा घेणारे अजय चौधरी कोण आहेत? पक्षाकडून मोठी जबाबदारी


मुंबई: शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि राज्य सरकारमधील नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेसह राज्यातील राजकारणामध्ये खळबळ उडाली आहे. एकीकडे एकनाथ शिंदे यांची मनधरणी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तर, दुसरीकडे शिंदेंना गटनेतेपदावरुन हटविण्यात आले आहे. शिंदेंच्याजागी मुंबईतील शिवसेना आमदाराला संधी देण्यात आली आहे. 

महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेत फूट पडल्याचे चित्र आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्याने अनेकांना धक्का बसला आहे. दरम्यान, पक्षाने शिंदेंना गटनेते पदावरुन हटवून, त्यांच्या जागी अजय चौधरी यांची गटनेते म्हणून निवड केली आहे. त्यांच्या निवडीनंतर अजय चौधरी कोण आहेत, याबाबत अनेकांना उत्सुकता लागली आहे.


कोण आहेत अजय चौधरी?
अजय चौधरी हे शिवडी विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार आहेत. 2019 मध्ये शिवडी विधानसभा मतदारसंघातून चौधरी विजयी झाले होते. त्यांची आमदार म्हणून दुसरी टर्म आहे. त्यांनी मनसेचे उमेदवार संतोष नलावडे यांचा दारुण पराभव केला होता. अजय चौधरी हे फार मोठं नाव नाही, त्यामुळे त्यांच्या माध्यमातून ठाकरे कुटुंब पक्षाची दोरी आपल्या हातात ठेवणार असल्याचे बोलले जात आहे.

एकनाथ शिंदेंच्या पक्षापुढे या अटी...
एकनाथ शिंदे यांनी बंड मागे घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्यासमोर काही अटी ठेवल्या आहेत. यात काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत यापुढे आघाडी नको. त्याऐवजी शिवसेनेने भाजपासोबत युती करून सत्ता स्थापन करावी. देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपद द्यावं आणि एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रिपद द्यावं, अशी अट शिंदे यांनी ठेवल्याचे बोलला जात आहे. 
 

Web Title: Who is Ajay Chaudhary who replaced Eknath Shinde? big responsibility from the party