शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
2
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
3
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान
4
मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई
5
छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा
6
ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता
7
मतदारयाद्या पुनरावलोकनाच्या काही नियमांत सूट; बिहार निवडणूक; आता बीएलओंवर जबाबदारी
8
दोन ठाकरेंच्या एकत्र येण्याचे असे झाले प्लॅनिंग..!
9
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
10
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
11
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
12
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
13
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
14
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
15
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
16
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
17
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
18
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
19
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
20
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा

Corona Vaccine: “राज्यात मोफत लसीकरण पण ज्यांना शक्य आहे त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत पैसे दान करा”

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2021 15:57 IST

ही रक्कम कोविड 19 संबंधित इतर कामांसाठी वापरली जाऊ शकते जसे की औषधे खरेदी करणे, ऑक्सिजन प्लांट्सची उभारणी करणे यासाठी मार्गी लागेल असं आवाहन सत्यजित तांबे यांनी केले आहे.

ठळक मुद्देमी पैसे देण्यास सक्षम असलेल्या सर्वांना आवाहन करतो की, कृपया मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये लसीची रक्कम दान करा.ही रक्कम कोविड 19 संबंधित इतर कामांसाठी वापरली जाऊ शकते जसे की औषधे खरेदी करणे, ऑक्सिजन प्लांट्सची उभारणी करणे यासाठी मार्गी लागेल कोरोना ही राष्ट्रीय आपत्ती असल्याने प्रत्येक नागरिकाचे मोफत लसीकरण करण्याची जबाबदारी मोदी सरकारची होती.

मुंबई – राज्यात येत्या १ मे पासून १८ वर्षावरील वयोगटातील सर्वांना मोफत लसीकरण केलं जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला. सरकारने मोफत लसीकरणाचा निर्णय घेतल्याबद्दल महाविकास आघाडी सरकारचे आभारी आहोत. त्याचसोबत ज्यांना शक्य आहे त्यांनी मुख्यमंत्री मदत निधीत लसीची रक्कम दान करा असं आवाहन महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी युवकांना केले आहे.

याबाबत सत्यजित तांबे म्हणाले की, महाराष्ट्र शासनाने १८ वर्षांवरील सर्वांना मोफत लस देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व तरुणांच्या वतीने मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व संपूर्ण महाविकास आघाडी मंत्रिमंडळाचे आभार मानतो. तसेच मी पैसे देण्यास सक्षम असलेल्या सर्वांना आवाहन करतो की, कृपया मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये लसीची रक्कम दान करा. ही रक्कम कोविड 19 संबंधित इतर कामांसाठी वापरली जाऊ शकते जसे की औषधे खरेदी करणे, ऑक्सिजन प्लांट्सची उभारणी करणे यासाठी मार्गी लागेल असं आवाहन त्यांनी केले आहे.

कारण संकटाच्या काळात जनतेला वाऱ्यावर सोडणं ही काँग्रेसची संस्कृती नाही!

खरंतर कोरोना ही राष्ट्रीय आपत्ती असल्याने प्रत्येक नागरिकाचे मोफत लसीकरण करण्याची जबाबदारी मोदी सरकारची होती. मात्र इथे देखील त्यांनी जबाबदारीपासून पळ काढला. परंतु त्यांनी हात झटकले म्हणून आम्हीही हात झटकणार नाही असं काँग्रेसनं म्हटलं आहे त्याचसोबत केंद्रापासून राज्यापर्यंत मोफत लसीकरणासाठी काँग्रेस नेत्यांनी पाठपुरावा केला त्याला यश आलं. कोरोनाचा प्रसार रोखायचा असेल तर व्यापक लसीकरणाशिवाय पर्याय नाही ही भूमिका काँग्रेसने मांडली आणि त्यासाठी पाठपुरावा देखील केला. या पाठपुराव्याचे यश म्हणूनच आज सर्वांच्या मोफत लसीकरणाचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला असून प्रत्येक नागरिकाला मोफत लस मिळणार आहे. स्वातंत्र्यानंतर कुठलाही भेद न करता सर्वांचे मोफत लसीकरण करत काँग्रेसने लोकांचे जीव वाचवले. आणि आताही निर्बंध लागू करण्याआधी, लसीचे दर ठरण्याआधीच काँग्रेसने मोफत लसीकरणाची मागणी केली होती असंही काँग्रेसनं म्हटलं आहे.

कोविन एपवर नोंदणी करा

१८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांनी  कोविन मोबाईल एपवर नोंदणी करावी, कुठेही लसीकरण केंद्रांवर गर्दी करू नये लसीकरणाबाबत व्यवस्थित व सुस्पष्ट सूचना मिळतील असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे. १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण कार्यक्रमाचे नियोजन करताना कुठलीही अडचण येणार नाही याची काळजी घेण्याची मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला सूचना केली आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याSatyajit Tambeसत्यजित तांबेcongressकाँग्रेसUddhav Thackerayउद्धव ठाकरे