शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्याची ५२५ कोटींची मदत देणार कुठे-कुठे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2019 06:41 IST

पहिल्या टप्प्यातील दुष्काळनिधी; नियोजनाचा अभाव; निवडणुकीनंतर दुसरा हप्ता

औरंगाबाद : मराठवाड्यात कमी पावसाअभावी यंदाचा खरीप हंगाम वाया गेला असून, विभागात प्रचंड दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे शासनाने २,५६४ कोटी ९१ लाख रुपयांची एकूण तरतूद बाधित शेतकऱ्यांसाठी केली आहे. त्यातून ५२५ कोटी रुपयांचा पहिला टप्पा मिळणार आहे. या मदतीचे वाटप कशी व कुठे करायची याचे नियोजन नसल्यामुळे त्याचे वितरित कसे करणार हा प्रश्न आहे.लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेत दुष्काळ मदत निधी अडकला तर आचारसंहितेनंतरच दुसरा हप्ता येण्याचा मार्ग मोकळा होण्याचे प्रशासकीय संकेत आहेत.ही मदत थेट शेतकºयांच्या खात्यावर जमा करण्यात येणार असून, यातून बँकेने कुठलीही वसुली करू नये, असे २५ जानेवारीच्या शासन अध्यादेशात म्हटले आहे. शेती पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांना दोन हप्त्यात मदत करण्यात यावी. प्रथम हप्ता ६ हजार ८०० रुपये प्रतिहेक्टरप्रमाणे ५० टक्के म्हणजेच ३४०० रुपये प्रतिहेक्टर रक्कम शेती पिकांच्या नुकसानीच्या अनुषंगाने प्रथम देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात बीडमध्ये १२६ कोटी तर औरंगाबादमध्ये १११ कोटी रुपयांचे वाटप करावे लागणार आहेत. त्याखालोखाल जालन्यात ९७ कोटींचे वाटप होईल.जवळपास सर्व बाधित शेतकºयांपर्यंत ही मदत पोहोचेल. मंडळनिहाय, गावनिहाय कामांचा आढावा घेऊन मदत निधी वाटप होईल. निधी वाटपाला विलंब होऊ नये, अशा सूचना विभागीय पातळीवर दिल्याचे विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी सांगितले.लातूर, नांदेडला सर्वात कमी निधीमराठवाड्यात लातूर, नांदेडला सर्वाधिक कमी निधी मिळाला आहे. लातूरसाठी ६ कोटी ६३ लाख रुपये मंजूर झाले असून, ३ कोटी ३१ लाख पहिल्या टप्प्यात मिळणार आहेत.नांदेड जिल्ह्यासाठीही ५१.५१ कोटी मंजूर झाले असून, त्याचा पहिला टप्पा २५.७५ कोटींचा राहणार आहे.लातूर जिल्ह्यात खरिपाचे शेकडो कोटींचे नुकसान झाले असताना केवळ ६ कोटी रुपये मदत शासनाकडून जाहीर झाली. ही बाब दुजाभाव करणारी असल्याचे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार सस्तापुरे म्हणाले.

टॅग्स :droughtदुष्काळMarathwadaमराठवाडा