शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
2
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
3
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
4
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
5
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
7
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
8
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
9
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
10
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
11
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
12
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
13
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
14
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
15
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
16
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
17
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
18
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
19
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
20
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !

'आमचं सरकार होतं तेव्हाही कुठे विलिनीकरण झालं..? जनतेने आता हुशार व्हावं'- महादेव जानकर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2021 12:33 PM

बुलडाण्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांचे आंदोलन सुरू आहे, त्या ठिकाणी महादेव जानकर यांनी त्यांची भेट घेतली.

बुलडाणा: मागील काही दिवसांपासून राज्यातील सर्व एसटीचे कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीसाठी संपावर गेले आहेत. कर्मचाऱ्यांचा संप संपवण्यासाठी सरकारकडून अनेक प्रयत्न झाले, पण संपकरी कर्मचारी ऐकायला तयार नाहीत. ते आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. दरम्यान, भाजपचा मित्रपक्ष असलेल्या रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी एसटीच्या विलिनीकरणावर भाष्य करताना भाजपला घरचा आहेर दिला आहे. 

भाजपला घरचा आहेरमुंबईतील आझाद मैदानात भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्त्वात एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांची महादेव जानकर यांनी भेट घेतली. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना महादेव जानकर म्हणाले की, 'आमचं सरकार होतं तेव्हाही हा प्रश्न निर्माण झाला होता, तेव्हाही कुठे विलीनीकरण झालं..? रस्त्यावर बोलतांना एक असतं आणि आत गेल्यावर वेगळं असतं. सिस्टीमचा भाग असतो, त्याप्रमाणं जावं लागतं, असं ते म्हणाले. 

रविकांत तुपकर यांचे बुलडाण्यात आंदोलनशेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी बुलडाण्यात आंदोलन पुकारलंय. महादेव जानकर यांनी बुलडाण्यात जाऊन तुपकर यांची भेट घेतली. रवीकांत तुपकर माझे चांगले मित्र असून त्यांना भेटण्यासाठी आलो असल्याचं मत महादेव जानकर यांनी व्यक्त केलं. तसेच, तुपकर चळवळीतील कार्यकर्ते आहेत. सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात त्यांना चर्चा करायला बोलावले. एकमेकांच्या सुख दुःखात सहभागी व्हावे, म्हणून मी आलो असल्याचे मत महादेव जानकर यांनी व्यक्त केले आहे.

टॅग्स :Mahadev Jankarमहादेव जानकरST Strikeएसटी संपDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरे