शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
3
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
4
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
5
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
6
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
7
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
8
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
9
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
10
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
11
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
12
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
13
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
14
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

कुठून आणता मासे....? येथून पुढे फक्त ‘उजनी’चे नका आणू : अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2018 16:40 IST

उजनी धरणाचे पाणी विषारी झाले आहे.याबाबतची बातमी वाचुन आपण आश्चर्यचकित झालो...

ठळक मुद्देउजनीच्या प्रदुषित पाण्यातील माशांवर बिनधास्तपणे ताव मारणाऱ्या खवय्यांना अजित पवार यांचा सल्ला

बारामती : उजनी धरणाचे पाणी विषारी झाले आहे.याबाबतची बातमी वाचुन आपण आश्चर्यचकित झालो. या धरणातील मासे खाताना सावधानता बाळगा,नाहीतर व्हायच तिसरेच काहीतरी, अशा शब्दांत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उजनी धरणातील पाणी प्रदुषणाबाबत चिंता व्यक्त केली. बारामती शहरातील मोतीबाग परिसरात काटेवाडी गावातील युवकाने सुरु केलेल्या हॉटेलचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते झाले.यावेळी पवार यांनी मोतीबाग परिसरात मच्छी ढाबा चालविणाऱ्या काटेवाडीच्या युवकाला खास शैलीत सल्ला दिला. पवार म्हणाले, म्हणाले,परवा पेपरला वाचताना उजनी धरणाचे पाणी विषारी झाले आहे असी बातमी वाचण्यात आली.. त्यामुळे तुम्ही मासे कोठुन आणता, उजनी धरणातील मासे आणु नका.त्याऐवजी वीर भाटघर किंवा घोडनदीमधून मासे आणा. त्यावर उपस्थितांमध्ये हशा पिकला. गेल्या अनेक वर्षांपासुन उजनी धरणाच्या प्रदुषणाचा प्रश्न धुमसतो आहे. सोलापूर विद्यापीठानं हे पाणी सतत प्यायल्याने कॅन्सरचा धोका होण्याची शक्यता वर्तवली आहे.याबाबत माध्यमांनी वृत्त देखील प्रसिध्द केले आहेत.जलतज्ञ,संशोधकांनी उजनी धरणातले पाणी विषारी असल्याचे निष्कर्ष मांडले आहेत. विद्यापीठाने वर्तविलेल्या शक्यतेवरुन पुन्हा एकदा उजनी धरणाच्या प्रदुषणाचा प्रश्न ऐरणीवर आला  आहे. यावर आज पवार यांनी देखील चिंता व्यक्त केल्याने हा प्रदुषणाचा प्रश्न पुन्हा अधोरेखित झाला आहे. पवार यांनी बारामती येथील कार्यक्रमात उजनी धरणातील मासे मच्छी ढाबा चालविणाऱ्या आणून एका व्यावसायिकाला कानपिचक्या दिल्या. पवार यांनी उजनीचं पाणी आणि मासे खाताना सावधानता बाळगण्याचा सल्ला दिला. यावेळी बोलताना त्यांनी एका हॉटेल व्यावसायिकाला मासे कुठून आणतो अशीही विचारणा केली. उजनीचे मासे आणू नका, असा सल्ला पवार यांनी दिला. पवार यांनी दिलेल्या सल्यानंतर मासे खाणाऱ्या खवय्यांच्या भुवया उंचावल्या. उजनीच्या प्रदुषित पाण्यातील माशांवर बिनधास्तपणे ताव मारणाऱ्या खवय्यांना पवार यांचा सल्ला चांगलाच रुचल्याचे यावेळी चर्चेतून दिसुन आले.————————

टॅग्स :BaramatiबारामतीPuneपुणेAjit Pawarअजित पवारUjine Damउजनी धरण