शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
2
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
3
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
4
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
5
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
6
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
8
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
9
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
10
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
11
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
12
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
13
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
14
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
15
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
16
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
17
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
18
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
19
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
20
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा

बुलेट ट्रेनसाठी २० हजार कोटी कुठून आले? राष्ट्रवादी काँग्रेसचा सवाल, कर्जमाफीचे पैसे द्या, अन्यथा...  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 04:45 IST

ृशेतक-यांच्या कर्जमाफीसाठी पैसे नाहीत, मग गुजरातहून निघणा-या बुलेट ट्रेनसाठी २० हजार कोटी रुपये कुठून आले, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केला.

मुंबई : शेतक-यांच्या कर्जमाफीसाठी पैसे नाहीत, मग गुजरातहून निघणा-या बुलेट ट्रेनसाठी २० हजार कोटी रुपये कुठून आले, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केला.राज्यात पेट्रोलच्या दराचा भडका उडालेला असताना त्यावर लोकांनी रोष वक्त करू नये म्हणून महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्यात १० लाख शेतकरी बोगस असल्याचे विधान केले असावे, असा आरोपही तटकरेंनी केला.कोंडाणे सिंचन प्रकल्पाची तीन वर्षांपासून चौकशी सुरू आहे. आम्ही त्यासाठी सहकार्य करत आहोत. प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने यापेक्षा अधिक बोलणार नाही, असे सांगत तटकरे यांनी या विषयावर अधिक भाष्य टाळले.कर्जमाफी देण्यास दिरंगाई करण्यासाठीच सरकारने आॅनलाइन प्रक्रिया आणल्याचा आरोप करत शेतकºयांच्या खात्यात ताबडतोब रकमा जमा कराव्यात; अन्यथा १ आॅक्टोबरपासून राज्यात तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा तटकरे यांनी दिला.अनेक आमदार भाजपाच्या संपर्कात आहेत, अशा बातम्या येतात मात्र तुमच्या पक्षाकडून त्याचे कोणतेही खंडन केले जात नाही याकडे लक्ष वेधले असता तटकरे म्हणाले, विचारसरणी, ध्येयवाद या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. सगळ्याच पक्षांत कमी-जास्त प्रमाणात संधीसाधूंची संख्या असते. पण आमच्याकडचे कोणीही तसे नाही असे मी म्हणेन, असा दावाही त्यांनी केला.आम्ही सत्ता सोडली तेव्हा वीज उत्पादन आणि वीज मागणी यातील तफावत भरून काढली होती. आताच्या सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे विजेची टंचाई झाली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रूड आॅइलचे दर कमी झाले असताना देशभरात पेट्रोलचे दर गगनाला भिडले आहेत. मुंबईत देशातील सर्वांत महागडे पेट्रोल विकले जात आहे. हेच का अच्छे दिन, असा सवाल तटकरेंनी केला.

टॅग्स :Bullet Trainबुलेट ट्रेनMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारFarmerशेतकरी