शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर रात्रीच हल्ला? नेतन्याहू यांच्या विमानाचं हवेत उड्डाण; ५० ठिकाणं अमेरिकेच्या हिटलिस्टवर
2
इराण-अमेरिका युद्धाची शक्यता? तेहरानच्या इशाऱ्यानंतर कतारमधील अमेरिकन हवाई तळ केले रिकामे
3
Daryl Mitchell च्या शतकासह यंगची 'विल पॉवर'! टीम इंडियावर पलटवार करत न्यूझीलंडनं साधला बरोबरीचा डाव
4
अमेरिकेच्या टॅरिफ धोरणावर आज रात्री फैसला; ट्रम्प यांच्याविरोधात निकाल गेल्यास काय घडू शकतं?
5
Daryl Mitchell Hundred : डॅरिल मिचेलची कडक सेंच्युरी; किंग कोहलीच 'नंबर वन' स्थान धोक्यात!
6
अमेरिकेने केली इराणची कोंडी, चारही बाजूंनी घेरले; 'या' देशांमध्ये लष्करी तळ...
7
हजारीबागमध्ये भीषण बॉम्ब ब्लास्ट, तिघांचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी
8
शिंदेंच्या उमेदवाराच्या घरावर मतदानाआधी दगडफेक; खिडक्या फोडल्या, खुर्च्या तोडल्या, प्रचंड राडा
9
मैत्री मैत्रीच्या ठिकाणी...! युद्धात इराणला साथ देणार नाही चीन? कारण काय?
10
धक्कादायक ! नागपुरात बाप झाला सैतान,पत्नीकडे ताबा जाऊ नये म्हणून पोटच्या मुलीची हत्या
11
लहानपणीची गोंडस मुलगी आता झालीये सुपरहॉट, रेड बॅकलेस ड्रेसमध्ये सारा अर्जुनचा किलर लूक!
12
"JJD हा लालूंचा खरा पक्ष"; राजद विलीनीकरणावर तेजप्रताप यांची तेजस्वींना थेट ऑफर
13
Petrol कार्सच्या तुलनेत Diesel कार्स जास्त मायलेज का देतात? जाणून घ्या यामागील विज्ञान...
14
बांगलादेशचा आडमुठेपणा! भारतात टी-२० वर्ल्डकप खेळण्यास नकार; आता आयसीसीकडे आहेत ३ पर्याय!
15
IND vs NZ : हर्षित राणानं ऑफ स्टंप उडवत डेवॉन कॉन्वेचा केला करेक्ट कार्यक्रम! गंभीरने अशी दिली दाद
16
मुस्लिमबहुल प्रभागांत रंगणार काँग्रेस-एमआयएम सामना! १३ जागांसाठी काँग्रेसची धडपड, शिंदेसेना चारही जागा राखणार?
17
डोंबिवलीत भाजपा अन् शिंदेसेनेत जोरदार राडा; ५ जणांना अटक, जखमींवर रुग्णालयात उपचार
18
Video - ई-रिक्षातील तरुणाचं अश्लील कृत्य; रणरागिणीने रस्त्यावरच घडवली चांगलीच अद्दल
19
"विना परवाना शस्त्र वाटणार, ज्याला हवं त्याने..."; योगी सरकारच्या मंत्र्याचं धक्कादायक विधान
20
भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद, आता ५५ देशांमध्ये व्हिसा-मुक्त प्रवेशाची परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

महापौरपदाचे आरक्षण केव्हा होणार जाहीर ? आरक्षित गटात कुणीच विजयी झाले नसेल तर काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 18:52 IST

Nagpur : राज्यातील २९ महापालिकांसाठी येत्या १५ जानेवारी रोजी मतदान होत आहे. मात्र, निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक असतानाही अद्याप महापौर पदाचे आरक्षण जाहीर झालेले नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यातील २९ महापालिकांसाठी येत्या १५ जानेवारी रोजी मतदान होत आहे. मात्र, निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक असतानाही अद्याप महापौर पदाचे आरक्षण जाहीर झालेले नाही. राज्याच्या निवडणुकीच्या इतिहासात महापौर आरक्षणाची सोडत न होता निवडणूक होण्याची ही पहिलीच वेळ असल्याने प्रशासकीय आणि राजकीय पातळीवर संभ्रमाचे वातावरण आहे.

यापूर्वी महापालिका निवडणुकीच्या आधी महापौरपदाचे आरक्षण रोटेशन किंवा लॉटरी पद्धतीने निश्चित केले जात असे. मात्र, यावेळी असे काहीही झालेले नाही. सामान्यतः महापालिका निवडणुकांपूर्वी किंवा प्रभाग रचनेदरम्यानच महापौरपदाचे आरक्षण जाहीर केले जाते. यामुळे कोणत्या प्रवर्गातील उमेदवाराला संधी मिळेल, हे स्पष्ट होत असे. मात्र, यावेळी अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. यात प्रामुख्याने दोन तांत्रिक मुद्यांवर चर्चा सुरू आहे. निवडणुकांनुसार मागील ठरलेल्या जुन्या रोटेशेननुसार महापौरपदाचे आरक्षण काढले जाईल की झीरो रोस्टर करून आरक्षणाची नवीन पद्धतीने नव्याने सुरुवात केली जाईल, हेदेखील स्पष्ट करण्यात आलेले नाही.

कार्यकाळ आणि नियमात बदलाची शक्यता ?

सध्या महापौरपदाचा कार्यकाळ हा अडीच वर्षांचा असतो. मात्र, आरक्षण जाहीर करण्यास होत असलेला विलंब पाहता, शासनाकडून या कार्यकाळात काही बदल केला जाणार का किंवा निवडून आलेल्या नगरसेवकांमधून विशिष्ट पद्धतीने निवड केली जाणार का, अशी शंकाही उपस्थित केली जात आहे.

ओबीसी आरक्षण की राजकीय खेळी?

महापौरपदाचे आरक्षण जाहीर न होण्यामागे ओबीसी आरक्षणाचा सर्वोच्च न्यायालयात असलेला तिढा हे कारण प्रशासनाकडून दिले जात आहे. जोपर्यंत न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होत नाही, तोपर्यंत आरक्षण निश्चित करणे कठीण असल्याचे बोलले जात आहे. मात्र, राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा रंगली आहे. निवडणुकीपूर्वी महापौरपदाचे आरक्षण जाहीर केल्यास पक्षात अंतर्गत बंडाळी किंवा गटबाजी होण्याची शक्यता असते. ही स्पर्धा टाळण्यासाठी आणि इच्छुकांची नाराजी ओढवून न घेण्यासाठी जाणीवपूर्वक आरक्षण लांबणीवर टाकल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.

आरक्षित गटात कुणीच विजयी झाले नसेल तर काय?

  • महापौरपदाचे आरक्षण निवडणुकीपूर्वी जाहीर झाले तर राजकीय पक्ष त्यानुसार महापौरपदासाठी सक्षम असलेले उमेदवार रिंगणात उतरवितात.
  • निवडणुकीनंतर एखाद्या पक्षाला महापालिकेत बहुमत मिळाले व महापौरपदाचे आरक्षण ज्या संवर्गासाठी राखीव आहे त्या संवर्गातील एकही जागा संबंधित पक्षाने जिंकली नसेल तर अशावेळी संबंधित पक्षाची गोची होईल.
  • पारदर्शक लोकशाहीसाठी निवडणुकीपूर्वीच नियमावली स्पष्ट असणे गरजेचे आहे, असे मत एका ज्येष्ठ कायदेतज्ज्ञाने व्यक्त केले.
English
हिंदी सारांश
Web Title : Nagpur Mayor Election: Reservation Announcement Delay Sparks Uncertainty and Political Speculation

Web Summary : Nagpur's upcoming mayoral election faces uncertainty as reservation announcement delays spark administrative confusion and political speculation. Concerns arise regarding potential rule changes, OBC reservation impact, and post-election scenarios if reserved categories lack representation.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६Nagpur Municipal Corporation Electionनागपूर महानगरपालिका निवडणूक २०२६Electionनिवडणूक 2026VotingमतदानElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग