Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2025 14:37 IST2025-09-11T14:22:31+5:302025-09-11T14:37:29+5:30

Ladki Bahin Yojana August Installment News: मुख्यमंत्री लाडक बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता काही दिवसात जमा होणार असल्याची माहिती मंत्र आदिती तटकरे यांनी दिली.

When will the August installment of 'Mukhyamantri Ladki Bahin Yojana' arrive? Aditi Tatkare gave information | Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती

Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती

Ladki Bahin Yojana August Installment: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची प्रतिक्षा अनेक महिला करत आहे. ऑगस्ट महिना संपूनही दहा दिवस उलटले तरीही हप्ता जमा झालेला नाही. दरम्यान, आता याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. या योजनेच्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता वर्ग करण्यात आला आहे. यासाठी ३४४ कोटी वर्ग करण्यात आले आहेत. 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस आज पासून सुरुवात होत आहे', अशी माहिती मत्री आदिती तटकरे यांनी दिली. 

"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा

याबाबत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्वतः सोशल मीडियवर ही माहिती दिली. "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती !मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस आज पासून सुरुवात होत असल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्टमध्ये दिली. 

'महाराष्ट्रातील माता-भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे. लवकरच या योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात सन्मान निधी वितरित होणार आहे, असंही या पोस्टमध्ये म्हटले आहे. 

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी २ कोटी ४८ लाख महिला लाभार्थी आहेत. या योजनेतून लाखो महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. या महिलांनी निकषाबाहेर जाऊन योजनेचा लाभ घेतला होता. यामुळे या महिलांचे अर्ज बाद केले आहेत.

Web Title: When will the August installment of 'Mukhyamantri Ladki Bahin Yojana' arrive? Aditi Tatkare gave information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.