शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
5
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
6
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
7
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
8
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
9
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
10
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
11
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
12
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
13
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
14
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
15
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
16
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
17
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
18
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
Daily Top 2Weekly Top 5

कधी मिळणार गिरणी कामगारांना घरकूल

By admin | Updated: November 19, 2014 00:44 IST

महाराष्ट्रात २००२-०३ मध्ये गिरण्या बंद झाल्या. गिरण्या बंद झाल्याने मुंबई सोडून उर्वरित महाराष्ट्रातील २० हजारावर कामगार बेरोजगार झाले. या गिरणी कामगारांनी घरकुलाची मागणी सरकारकडे केली होती.

२० हजार कामगारांवर अन्याय : कामगारांच्या वसाहतीकडेही दुर्लक्षमंगेश व्यवहारे - नागपूर महाराष्ट्रात २००२-०३ मध्ये गिरण्या बंद झाल्या. गिरण्या बंद झाल्याने मुंबई सोडून उर्वरित महाराष्ट्रातील २० हजारावर कामगार बेरोजगार झाले. या गिरणी कामगारांनी घरकुलाची मागणी सरकारकडे केली होती. सरकारने गिरण्यांच्या जागा बिल्डरांना विकल्या, मात्र कामगारांना घरकुल काही उपलब्ध केले नाही. नागपुरातही १०० वर्षे जुन्या गणेशपेठ येथील मॉडेल मिल वसाहतीतील घरकुलाच्या निर्मितीसाठी उच्च न्यायालयाने आदेश देऊनही सात वर्षे लोटली आहे. मात्र अद्यापही घरकुलाची स्वप्नपूर्ती झालेली नाही. महाराष्ट्र व केंद्र सरकारने राज्यातील २५ पेक्षा अधिक कापडगिरण्या कामगारांना नुकसानभरपाई देऊन बंद केल्या. यातील १५ गिरण्या नागपूर, अकोला, हिंगणघाट, पुलगाव, कळमेश्वर, बडनेरा, अचलपूर, जळगाव, अमळनेर, नांदेड, औरंगाबाद, धुळे, सोलापूर, कोल्हापूर शहरात होत्या. यात जवळपास २० हजारावर कामगार काम करीत होते. महाराष्ट्रात कापड गिरण्या बंद झाल्यानंतर मुंबईतील गिरणी कामगारांनी आंदोलन करून, गिरणीच्या जागेवर घरे बांधून देण्याची मागणी केली. महाराष्ट्र सरकारने ही मागणी मान्य करून, मुंबईच्या गिरणी कामगारांना ६० हजारावर घरकुल उपलब्ध केले. मुंबईच्या धर्तीवर उर्वरित महाराष्ट्रातील गिरणी कामगारांना घरे मिळावी, यासाठी डझनभर निवेदन देऊनही, सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले. कामगारांना घरकुल उपलब्ध करून न देता सरकार गिरणीच्या जागा बिल्डरांना विकत आहे. नागपुरात गिरणीची जागा ८० एकराच्या वर होती. यापैकी केवळ १३ एकर जागा राहिली आहे. उर्वरित जागा बिल्डर्सला विकण्यात आली आहे. महाराष्ट्र मोफीसिल टेक्सटाईल्स अ‍ॅण्ड अलाईड इंडस्ट्रीज वर्कर्स फेडरेशनच्या माध्यमातून मुंबईच्या धर्तीवर इतरत्रही कामगारांना घरे बांधून देण्याची मागणी होत आहे. यासंदर्भात राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी गृहराज्यमंत्री सचिन अहिर यांच्याकडे पाठपुरावा केला. मात्र त्यांनी निव्वळ आश्वासन देऊन, कामगारांच्या समस्येकडे दुर्लक्ष केले.नवीन सरकार सोडविणार का समस्या?कामगारांच्या प्रश्नासंदर्भात देवेंद्र फडणवीस आमदार असताना त्यांनी या समस्येवर विधानसभेत आवाज उचलला होता. त्यावर तत्कालीन मुख्यमंत्री व गृहनिर्माण राज्यमंत्र्यांनी आश्वासनही दिले होते. आता आवाज उचलणारे आमदार मुख्यमंत्री झाले आहे. त्यांच्याकडून अपेक्षा वाढल्या असल्याचे मत माजी मंत्री व महाराष्ट्र मोफीसील टेक्सटाईल्स अ‍ॅण्ड अलाईड इंडस्ट्रीज वर्कर्स फेडरेशनचे अध्यक्ष हरिभाऊ नाईक यांनी व्यक्त केले.