'वेळ आल्यावर मनातील रोष व्यक्त करणार; भाजपवर नव्हे, फडणवीस टीमवर नाराज'
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2020 06:42 IST2020-01-12T02:23:03+5:302020-01-12T06:42:59+5:30
शनिवारी दुपारी खडसे सहकुटुंब शनिशिंगणापूर येथे दर्शनासाठी आले होते

'वेळ आल्यावर मनातील रोष व्यक्त करणार; भाजपवर नव्हे, फडणवीस टीमवर नाराज'
नेवासा (जि. अहमदनगर) : भाजपवर नाराज नसून पक्षातील फडणवीस यांच्या टीमवर नाराज आहे. वेळ आल्यावर मनातील रोष व्यक्त करणार आहे, अशी भावना भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी येथे व्यक्त केली.
शनिवारी दुपारी खडसे सहकुटुंब शनिशिंगणापूर येथे दर्शनासाठी आले होते. त्यांनी उदासी महाराज मठात महापूजा करून शनीला अभिषेक घातला. चौथऱ्यावर जाऊन शनी दर्शन घेतले. खडसे म्हणाले, मला भाजपने खूप काही दिले. मी पक्षावर नाराज नाही. गेल्या पाच वर्षांपासून पक्षाकडून नव्हे तर देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्याबरोबर असणाºया गटाकडून माझ्यावर अन्याय होत आहे. यामुळे पक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत परळी येथील सभेत काही मुद्दे सांगितले. याविषयी योग्य वेळी अधिक सविस्तर बोलणार आहे.