शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

"बंडखोर ४० आमदार येतील, तेव्हा मनाने मेलेले असतील; त्यांना शवागृहात पाठवू पोस्ट-मार्टेमसाठी"

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2022 06:42 IST

एकनाथ शिंदे हे शिवसेनेत राहूनच मुख्यमंत्री होऊ शकतात. आज चाळीस आमदारांची फौज त्यांच्याबरोबर आहे. या आकड्यात पैशांना चटावलेले बाजारबुणगेच जास्त दिसतात. ईडीच्या भीतीने वर्षानुवर्षांच्या निष्ठा विकणारे उद्या शिंदे यांना सोडूनही पळ काढतील.

मुंबई : गुवाहाटीत जे ४० लोक आहेत ती जिवंत प्रेते आहेत, मुडदे आहेत. त्यांच्या बॉड्या इकडे येणार आहेत. त्यांचे आत्मे मेलेले असतील. इथे जी आग पेटली आहे, त्यात काय होऊ शकते हे त्यांना माहीत आहे, त्यामुळे ते लटपटत आहेत. ते ४० लोक जेव्हा उतरतील तेव्हा ते मनाने जिवंत नसतील, अशा शब्दांत शिवसेना नेते, खा. संजय राऊत यांनी बंडखोर शिवसेना आमदारांवर जहरी टीका केली.एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदारांच्या बंडाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून मुंबईत ठिकठिकाणी मेळावे आयोजित केले जात आहेत. दहिसर येथील मेळाव्यात बोलताना संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांवर जहरी टीका केली. या ४० आमदारांच्या बॉड्या इथे येतील. त्यांना डायरेक्ट शवागृहात पाठवू पोस्ट-मार्टेमसाठी. हे जिथे थांबले त्या गुवाहाटीत कामाख्या देवीचे जागरूक मंदिर आहे. तिथे रेड्याचे बळी देतात. आम्ही ४० रेडे पाठविले आहेत, द्या बळी. शिवसेनेच्या विरोधात कट-कारस्थान सुरू आहे. त्यावर लढा देत मात करू. अरे तुम्ही काय शिवसेनेशी लढणार? मेले तुम्ही अशा शब्दांत त्यांनी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांवर हल्लाबोल केला.

चाय तिकडला न्यायअब्दुल सत्तार यांचे कोणते हिंदुत्व महाविकास आघाडीमुळे धोक्यात आले? दीपक केसरकर हे काँग्रेस, राष्ट्रवादी असा प्रवास करीत शिवसेनेत आले. त्यांनी भाजप व हिंदुत्वाच्या गप्पा माराव्या हे गमतीचे आहे. तानाजी सावंत, सुहास कांदे हे फिरस्ते आहेत. ‘चाय तिकडला न्याय’ हे त्यांचे धोरण. 

ईडीच्या तलवारीप्रताप सरनाईक, यामिनी जाधव, लता सोनवणे या आमदारांवर ईडी व जात पडताळणीसंदर्भात तलवारी लटकल्या होत्या. माझ्या ईडीच्या सर्व केसेस क्लीअर झाल्या. मी सुटलो. त्यामुळे मी भाजप सांगेल ते करतोय, असे सांगून ठाण्याचे एक आमदार सुरतला गेले. यामिनी जाधव, लता सोनवणे पोहोचल्या.

पैशांना चटावलेले बाजारबुणगेएकनाथ शिंदे हे शिवसेनेत राहूनच मुख्यमंत्री होऊ शकतात. आज चाळीस आमदारांची फौज त्यांच्याबरोबर आहे. या आकड्यात पैशांना चटावलेले बाजारबुणगेच जास्त दिसतात. ईडीच्या भीतीने वर्षानुवर्षांच्या निष्ठा विकणारे उद्या शिंदे यांना सोडूनही पळ काढतील.

पानटपरीवर पाठवूगुलाबराव पाटील हे स्वत:स शिवसेनेचा वाघ वगैरे म्हणवून घेतात. पानटपरीवाल्याला कॅबिनेट मंत्री केले. तेच गुलाबराव पाटील पोकळ धमकी देताच ते पळून गेले. त्यांना परत पानटपरीवर पाठवू. 

वॉचमन सत्तेतसंदीपान भुमरे यांना मोरेश्वर सावे यांची उमेदवारी कापून तेव्हा पैठणची उमेदवारी दिली. पैठणच्या एका साखर कारखान्याच्या दारात वॉचमनची नोकरी करणारा हा माणूस शिवसेनेमुळे सत्तेत आहे. वेळ येताच पळून गेला. 

आमच्या पक्षाचा एकच बाप-     उद्धव ठाकरे यांनी कालच सांगितले आहे की, बाळासाहेब ठाकरे यांचे नाव वापरू नका. तुमच्या बापाचे नाव वापरा आणि मते मागा. -     बाळासाहेबांचे भक्त पाठीत सुरा खुपसत नाही. जे व्हायचे, ते होऊ द्या. मुंबईत तर यावेच लागेल ना. शिवसैनिक रस्त्यावर आहेत, फक्त आमच्या इशाऱ्याची वाट बघत आहेत.-     आमच्या पक्षाचा एकच बाप आहे. तुमचे तर शंभर बाप आहेत. कुणी मुंबईत आहे. कुणी दिल्लीत आहे. कुणी नागपूरमध्ये आहे. तुम्ही दहा वेळा बाप बदलत आहात. कधी बडोद्याला जाता. कधी सुरतला जाता. कधी गुवाहाटीला जाता. कधी दिल्लीला जाता. बाप बदलणे आमच्या पक्षात चालत नाही, असेही राऊत म्हणाले.

तेव्हा भाजपचा जाच होतादादा भुसेंपासून अनेक आमदार जे फक्त शिवसेनेमुळे आमदार व मंत्री झाले, ते फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होते. तेव्हा भाजपचा जाच होता,  आज महाविकास आघाडीत आहेत तेव्हा त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादीचा त्रास होतोय.

-      शिवसेनेसमोरील हे संकट दूर होईल. हे संकट नाही तर संधी आहे. ताकदीने पुढे जाण्यासाठीचा धडा आहे. -     यापुढे कोणावर विश्वास ठेवायचा, कोणाच्या पालख्या व्हायच्या ते आता कळाले आहे, असेही ते म्हणाले. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतEknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना