शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

सातव्या वेतन आयोगाचा अध्यादेश कधी?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2019 6:19 AM

चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचा दोन दिवसांचा संप स्थगित

मुंबई : राज्यातील शासकीय कर्मचारी, अधिकाºयांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भातील शासकीय आदेश कधी निघणार या बाबत कमालीची उत्सुकता आहे. ‘जानेवारी पेड इन टू फेब्रुवारी’ अशी हमी राज्य सरकारने दिलेली होती मात्र, आता वेतनवाढीचा प्रत्यक्ष लाभ मार्चच्या पगारात मिळेल असे दिसते.सातव्या वेतन आयोगाच्या जीआरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सहीची प्रतीक्षा आहे. सामान्य प्रशासन विभागाने त्यासाठीचा मसुदा तयार ठेवला आहे आणि येत्या एकदोन दिवसात सह्या होतील व राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतर जीआर निघेल, अशी माहिती सूत्रांनी दिली. महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने आज मुख्यमंत्री फडणवीस यांना एक पत्र देऊन २०१६ पूर्वीच्या निवृत्तीवेतन धारकांचे/कुटुंब निवृत्तीवेतन धारकांचे निवृत्तीवेतन सुधारित करण्याची मागणी केली आहे.चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेने मंगळवारपासूनचा दोन दिवसांचा संप स्थगित केला आहे. संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब पठाण आणि अन्य पदाधिकाºयांशी मुख्य सचिव दिनेशकुमार जैन यांची चर्चा झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. चतुर्थश्रेणी कर्मचाºयांना म्हाडा व सिडकोमार्फत हक्काची घरे देण्यात येतील, आरोग्य विभागातील रिक्त चतुर्थश्रेणी कर्मचाºयांची पदे भरण्यात येतील, सातव्या वेतन आयोगाबाबतचा जीआर तातडीने काढण्यात येईल, असे आश्वासन जैन यांनी दिल्याचे पठाण यांनी लोकमतला सांगितले. कर्मचाºयांच्या सर्व मागण्यांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा लवकरच चर्चा करण्याचे आश्वासन जैन यांनी दिले.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र