शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

...शेतकऱ्यांना जेव्हा येतो मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंचा फोन.. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2020 20:31 IST

निवडणुकीपुर्वी सातबारा कोरा करण्याची भाषा करणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी प्रत्यक्षात घुमजाव केल्याची शेतकरी वर्गाची तक्रार आहे.

ठळक मुद्देशुक्रवारी सकाळीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी साधला कर्जमुक्तीसाठी शेतकऱ्यांना संपर्क कर्जखात्याला आधार लिंक करण्याचे आवाहन

इंदापूर ( शेटफळगढे ) : काही दिवसांपुर्वी ठाकरे सरकारने शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर केली आहे.मात्र, कर्जमाफी मिळविण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या प्रक्रियेबाबत शेतकरी अनभिज्ञ आहे. मात्र, आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मोबाईलवर संपर्क  साधुन कर्जमाफी योजनेच्या दिलेल्या माहितीची सर्वत्र चर्चा रंगली. अर्थात मुख्यमंत्र्यांनी साधलेला हा संवाद त्यांचा व्हॉईस मेसेज होता.

निवडणुकीपुर्वी सातबारा कोरा करण्याची भाषा करणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी प्रत्यक्षात घुमजाव केल्याची शेतकरी वर्गाची तक्रार आहे. यामध्ये दोन लाखांपेक्षा अधिक कर्जाचा बोजा असणारे शेतकरी,नियमित कर्जफेड करणारे शेतकरी नाराज आहेत. निवडणुकीच्या काळातच बड्या नेत्यांचे अशा प्रकारे व्हॉईस मेसेज द्वारे कॉल येतात. मात्र, निवडणुक नसताना खुद्द मुख्यमंत्री ठाकरे यांनी साधलेला संवाद शेतकऱ्यांच्या  चचेर्चा विषय ठरला. ग्रामीणभागात अनेकांनी त्यांना मुख्यमंत्री ठाकरे यांचा फोन आल्याचे एकमेंकांना सांगितले.व्हॉईस मेसेजचा प्रकार माहित नसणारे शेतकरी ठाकरे यांच्या व्हॉईस मेसेज कॉलने हरखुन गेल्याचे चित्र होते.     शुक्रवारी(दि ३) सकाळीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्जमुक्तीसाठी शेतकऱ्यांना द्वारे संपर्क साधला. यावेळी ठाकरे यांनी शेतकऱ्यांना कसे आहात, अशी चौकशी करुन योजनेची माहिती दिली आहे. शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंत कर्ज शासन भरणार आहे. तसेच चिंतामुक्त करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.  त्याचबरोबर येणाऱ्या काळातही शेतकऱ्यांनी चिंतामुक्त करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी वेगळे काहीकरण्याची गरज नाही. केवळ कर्जखात्याला आधार लिंक करण्याचे आवाहन  व्हॉईस कॉलमध्ये ठाकरे यांनी केले . मुख्यमंत्री स्वत: व्हॉइस कॉल द्वारे शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत. त्यामुळे व्हाईस कॉल शेतकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे.  प्रथमच शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या निर्णयाची माहिती थेट मुख्यमंत्री या कॉल द्वारे सांगत असल्याचा शेतकऱ्यांचा पहिलाच अनुभव आहे.———————————

टॅग्स :IndapurइंदापूरUddhav Thackerayउद्धव ठाकरेFarmerशेतकरीGovernmentसरकार