नवीन टर्मिनलचा विचार कधी?
By Admin | Updated: June 25, 2014 22:43 IST2014-06-25T22:43:36+5:302014-06-25T22:43:36+5:30
सध्या जवळपास 16क् हून अधिक रेल्वे गाडय़ा ये-जा करीत असतात़ वाढत्या लोकसंख्येला आवश्यक इतक्या नव्या रेल्वेगाडय़ा सुरू करायच्या असतील,

नवीन टर्मिनलचा विचार कधी?
>पुणो : पुणो रेल्वे स्टेशनवर सध्या जवळपास 16क् हून अधिक रेल्वे गाडय़ा ये-जा करीत असतात़ वाढत्या लोकसंख्येला आवश्यक इतक्या नव्या रेल्वेगाडय़ा सुरू करायच्या असतील, तर पुणो रेल्वे स्टेशनवर त्यांना जागाच शिल्लक नाही, त्यामुळे यापुढील काळात या महानगराला पर्यायी रेल्वे टर्मिनलची नितांत आवश्यकता आह़े त्यादृष्टीने रेल्वे प्रशासनाकडून प्रयत्न सुरु आहेत़ पण, ते पुरेसे नाहीत़ त्याच्याबरोबरच पुणो परिसराच्या विकासासाठी नवीन टर्मिनल आवश्यक असल्याने राज्य
शासनानेही पुढाकार घेण्याची तितकीच गरज आह़े
गेल्या 2 वर्षापासून रेल्वे प्रशासन पुणो स्टेशनला पर्याय म्हणून वेगवेगळ्या स्टेशनचा विचार करीत आली आह़े त्यात सर्वप्रथम खडकीचा विचार करण्यात आला पण तेथे आवश्यक तेवढी जागा उपलब्ध नसल्याचे दिसून आल़े आता शिवाजीनगर रेल्वे स्टेशनवरुन काही लोकल व एखाददुसरी एक्स्प्रेस गाडी सुरू करण्यास रेल्वेने सुरुवात केली आह़े पण, शिवाजीनगरला काही मर्यादा आहेत़ हे लक्षात आल्यावर हडपसर येथील रेल्वे स्टेशनचा विकास करण्याचा विचार पुढे आला आह़े
रेल्वेकडे हडपसर येथे 3क्क् एकर जागा होती़ पण, त्या जागेकडे दुर्लक्ष झाल्याने आता तेथे झोपडपट्टी झाली आह़े त्याबाबतच्या खटल्याचा निकाल रेल्वेच्या बाजूने झाला असला तरी आता तेथे झोपडपट्टी झाल्याने ती हटविण्याचा प्रयत्न झाला नाही़ त्यामुळे हडपसर येथे नवीन टर्मिनलच्या दृष्टीने काही मर्यादा आह़े पुणो रेल्वे विभागात आलेल्या वरिष्ठ अधिका:यांनी पुढच्या 2क् -25 वर्षाचा विचार करुन रेल्वेच्या विकासाच्या दृष्टीने विचार करुन काही प्रस्ताव तयार न केल्याने आज ही वेळ
आली आह़े (प्रतिनिधी)