शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
2
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
3
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
4
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
5
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
6
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
7
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
8
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
9
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
10
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
11
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
12
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
13
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
14
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
15
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
16
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
17
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
18
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
19
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
20
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल

सावधान! व्हॉट्सअ‍ॅप हॅकिंगद्वारे ब्लॅकमेलिंगचं प्रमाण वाढलं; सायबर पोलिसांचा सावधगिरीचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2020 19:38 IST

व्हॉट्सअ‍ॅप युझरच्या अकाउंटचा अ‍ॅक्सेस मिळाल्यानंतर, हे सायबर क्रूक्स त्याला अथवा तिला आक्षेपार्ह फोटो त्यांच्या कॉन्टॅक्ट किंवा ग्रुपमध्ये पाठवण्याची धमकी देत ब्लॅकमेल करत आहेत.

मुंबई - राज्यात सायबर सुरक्षा आणि सायबर गुन्ह्यांचा तपास करणाऱ्या सायबर सुरक्षा विभागाने व्हॉट्सअ‍ॅप वापरणाऱ्यांना सावधगिरीचा इशारा दिला आहे. यात, व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट हॅक करून ब्लॅकमेल करण्याचा नवा धंदा हॅकर्सनी सुरू केल्याचे सायबर सेलने म्हटले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप युझरच्या अकाउंटचा अ‍ॅक्सेस मिळाल्यानंतर, हे सायबर क्रूक्स त्याला अथवा तिला आक्षेपार्ह फोटो त्यांच्या कॉन्टॅक्ट किंवा ग्रुपमध्ये पाठवण्याची धमकी देत ब्लॅकमेल करत आहेत. महाराष्ट्र सायबर सेलने म्हटले आहे, की “अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. ज्यांत हॅकर पीडित युझरचे आक्षेपार्ह फोटो तो सदस्य असलेल्या ग्रुपमध्ये टाकतो. यानंतर ते पीडित व्यक्तींच्या कॉन्टॅक्ट्सच्या सहाय्याने त्यांचे अकाउंट हॅक करून त्यांच्याकडे पैशांची मागणी करतात.

महाराष्ट्र सायबरने युझर्सना केले अलर्ट -व्हॉट्सअ‍ॅप युझर आपला मोबाईल बदलतात, तेव्हा त्यांचा नवा मोबाईल हा त्यांच्या मोबाईल क्रमांकाशी लिंक झालेला आहे. याची त्यांनी खात्री करायला हवी. हे व्हॉट्सअ‍ॅप व्हेरिफिकेशन कोडद्वारे करता येते. हॅकरला युझर्सचा मोबाईल क्रमांक माहिती असतो. यामुळे, जर युझरने आपला व्हॉट्सअ‍ॅप व्हेरिफिकेशन कोड कुणाशी शेअर केला, तर हॅकरला त्याच्या अकाउंटचा अ‍ॅक्सेस मिळतो. यानंतर संबंधित युझरचे अकाउंट हॅक होते आणि हॅकरला युझरच्या सर्व संपर्कांचा आणि व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपचा अॅक्सेस मिळतो. यानंतर गुन्ह्यांना सुरुवात होते. 

एखाद्या युझरचा अ‍ॅक्सेस मिळाल्यानतंर हॅकर्स त्याच्या संपर्क क्रमांकांतील सर्वाधिक संपर्क असलेला एखादा क्रमांक हेरतात आणि संबंधित युझरला त्या सर्वाधिक संपर्क होणाऱ्या क्रमांकावरून व्हॉट्सअ‍ॅप व्हेरिफिकेशन कोड त्यांच्यापर्यंत पोहोचत नसल्याचे सांगतात. यामुळे पीडित युझर व्हेरिफिकेशन कोड आपल्या सर्वाधिक संपर्क असलेल्या क्रमांकावर पाठवतो आणि हॅकर त्याचे अकाउंट हॅक करतो.

महत्त्वाच्या बातम्या -

कपिल सिब्बल, आझाद भडकताच 'हे' दिग्गज नेते राहुल गांधींच्या मदतीला; असे केले ट्विट...

CoronaVaccine News: जबरदस्त! रशियानं तयार केली दुसरी कोरोना लस, कुठलेही साइड इफेक्‍ट नसल्याचा दावा

CoronaVaccine : 73 दिवसांत नाही! सीरमनं स्वतःच सांगितलं COVISHIELD लस केव्हा येणार बाजारात

ट्रम्प यांना पॉर्नस्टारला 33 लाख रुपये द्यावे लागणार; 'तो' सनसनाटी आरोप पडला महागात

CoronaVirus Vaccine : पाकिस्तान कोरोना लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील परीक्षणासाठी तयार!

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपMaharashtraमहाराष्ट्रPoliceपोलिसcyber crimeसायबर क्राइम