"जो हाल तेरे बाप का हुआ, वही तेरा होगा...!"; झिशान सिद्दीकी यांना जिवे मारण्याची धमकी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 00:50 IST2025-04-22T00:49:38+5:302025-04-22T00:50:34+5:30

दरम्यान, यसंदर्भात पोलिसांचे निवेदनही आले आहे. मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार, माजी आमदार झीशान बाबा सिद्दीकी यांना धमकीचा ईमेल आला आहे. या संदर्भात वांद्रे पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात येत आहे.

Whatever happened to your father will happen to you Threat to kill Zeeshan Siddique | "जो हाल तेरे बाप का हुआ, वही तेरा होगा...!"; झिशान सिद्दीकी यांना जिवे मारण्याची धमकी 

"जो हाल तेरे बाप का हुआ, वही तेरा होगा...!"; झिशान सिद्दीकी यांना जिवे मारण्याची धमकी 

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते तथा माजी आमदार झिशान बाबा सिद्दीकी यांना जिवे मारण्याची धमकी मिळाली आहे. ही धमकी एका ईमलच्या माध्यमाने देण्यात आली आहे. संबंधित मेलमध्ये, "जे हाल बाबा सिद्दीकी यांचे केले, तसेच तुझेही करू," असे म्हणण्यात आले आहे. याची माहिती सिद्दीकी यांनी मुंबई पोलिसांना दिली आहे. यानंतर पोलीस अलर्ट झाले आहेत.

संबंधित मेलची माहिती मिळताच, मुंबईतील वांद्रे पोलिसांनी झीशान सिद्दीकी यांच्या घरी पोहोचून तपासाला सुरवात केली आहे. झीशान सिद्दीकी यांचे वडील तथा माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची गेल्या वर्षातच हत्या झाली होती. यात, लॉरेन्स बिश्नोई टोळीचे नाव समोर आले होते. तेव्हापासून बाबा सिद्दीकी यांच्या कुटुंबाची सुरक्षितता वाढवण्यात आली आहे.

काय म्हणाले पोलीस? -
दरम्यान, यसंदर्भात पोलिसांचे निवेदनही आले आहे. मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार, माजी आमदार झीशान बाबा सिद्दीकी यांना धमकीचा ईमेल आला आहे. या संदर्भात वांद्रे पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात येत आहे.

गेल्या वर्षीही मिळाली होती धमकी -
गेल्या वर्षाच्या ऑक्टोबर महिन्यात बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर, झिशान सिद्दीकी यांनाही जीवे मारण्याची धमकी मिळाली होते. यानंतर मुंबई पोलिसांनी आरोपीला नोएडा येथून अटक केली होती. आरोपीने फोनवरून ही धमकी दिली होती. 

Web Title: Whatever happened to your father will happen to you Threat to kill Zeeshan Siddique

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :MONEYपैसा